वैवाहिक आयुष्याबद्दल राघव चड्ढा असं काही म्हणाला, जे ऐकून परिणितीचा चेहराच पडला!

वैवाहिक आयुष्याबद्दल राघव चड्ढा असं काही म्हणाला, जे ऐकून परिणितीचा चेहराच पडला!

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एका टीव्ही शोमध्ये एकत्र हजेरी लावली. रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या शोमध्ये दोघं त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. या एपिसोडचे काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यापैकी एका व्हिडीओवर परिणितीचे चाहते राघववर खूपच नाराज झाले आहेत. किंबहुना राघवने त्यांच्या वैवाहिक आयुष्यावरून केलेल्या विनोदामुळे खुद्द परिणितीलाही संकोचलेपणा जाणवल्याचं या व्हिडीओत दिसून येतंय.

काय म्हणाला राघव चड्ढा?

परिणितीसोबतच्या वैवाहिक आयुष्याबद्दल राघव म्हणतो, “मला असं वाटतं की आमचं वैवाहिक आयुष्य चांगलं चाललंय आणि ते यासाठी चांगलं चाललंय कारण मला बॉलिवूडचा बी सुद्धा येत नाही आणि तिला पॉलिटिक्सचा पी सुद्धा येत नाही. म्हणूनच आमची गाडी खूप चांगली चालतेय.” याविषयी तो पुढे म्हणतो, “आम्ही आनंदाने विवाहित आहोत. ती खुश आहे आणि मी विवाहित आहे. हे पहा, आम्ही तडजोड करतो. मी माझी चूक मान्य करतो आणि ती माझ्याशी सहमत होते की हो, चूक तुमचीच होती. याने सर्व समस्या ठीक होतात. वैवाहिक आयुष्याचं एक मंत्र आहे, तुम्ही ते समजून घेतलात तर तुमचं लग्न खूप यशस्वी ठरेल. तो मंत्र म्हणजे ‘हॅपी वाइफ इज हॅपी लाइफ’.. पत्नी खुश तर आयुष्य खुश. लग्न हे एक असं बंधन आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती नेहमी बरोबर असतो आणि दुसरी व्यक्ती नेहमी पती असतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rudra Dave (@ca_rudradave)

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स राघववर नाराज झाले आहेत. ‘एका गोष्टीची जाणीव होऊ लागली आहे की पैशाने दर्जा विकत घेतला जाऊ शकत नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘परिणिती अजिबात कम्फर्टेबल नाही, हे स्पष्ट दिसतंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘रंजक गोष्ट म्हणजे त्याने केलेले हे सर्व विनोद ओरिजिनलसुद्धा नाहीत’, असंही एका युजरने लिहिलं आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी 24 सप्टेंबर 2023 रोजी लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. उदयपूरमध्ये दोघांचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं होतं. राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;