“.. तर थिएटरची एकही काच शिल्लक राहणार नाही”; मनसेनं भरला दम

“.. तर थिएटरची एकही काच शिल्लक राहणार नाही”; मनसेनं भरला दम

‘धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज’ या चित्रपटाचा शो लावला नाही, तर चित्रपटगृहाची एकही काच शिल्लक राहणार नाही, असा सज्जड दम मनसेनं उल्हासनगरच्या मिराज अशोक अनिल चित्रपटगृहाला दिला आहे. या चित्रपटगृहाने ‘धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज’ चित्रपटाचा एकही शो न लावल्यामुळे मनसेनं चित्रपटगृहाबाहेर निदर्शनं करत व्यवस्थापकांना हा दम दिला आहे. उल्हासनगरच्या मिराज अशोक अनिल चित्रपटगृहात नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाचे दिवसाला 15 शो लावण्यात आले आहेत. तर ‘द साबरमती फाइल्स’ या चित्रपटाचा एक शो लावण्यात आला आहे. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा मात्र एकही शो या चित्रपटगृहात लावण्यात आलेला नाही. याबाबत तक्रारी आल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि शहराध्यक्ष संजय घुगे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट या चित्रपटगृहावर धडक देत निदर्शनं केली.

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा शो जर लागला नाही, तर चित्रपटगृहाची एकही काच शिल्लक राहणार नाही आणि चित्रपटगृहात एकही शो होऊ देणार नाही, असा सज्जड दम यावेळी मनसेनं चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना दिला. यानंतर येत्या एक ते दोन दिवसात या चित्रपटाचा शो लावण्याचं आश्वासन व्यवस्थापकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिलं आहे.

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा भव्य चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. या चित्रपटात ठाकूर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, मल्हार मोहिते-पाटील, संजय खापरे, पल्लवी वैद्य, कमलेश सावंत, विनीत शर्मा, प्रदीप रावत, प्रदीप कब्रा, राज जुत्शी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार शेलार म्हणतात, “संभाजी महाराजांचं जीवन म्हणजे प्रेरणादायी पराक्रमाची गाथा. ट्रेलरमध्ये आम्ही त्यांच्या संघर्षाच्या आणि वीरतेच्या काही महत्त्वाच्या क्षणांना उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याचा अनुभव घेता येईल.” धर्म आणि स्वराज्यासाठी समर्पित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची गाथा या चित्रपटात पाहायला मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;