पत्नीचा खून करून दारुड्या पतीचे पलायन, आरोपीला चेन्नईतून अटक

पत्नीचा खून करून दारुड्या पतीचे पलायन, आरोपीला चेन्नईतून अटक

पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपी दारुडा पती फरार झाला. ही माहिती मिळताच पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचा शोध सुरू केला. पण आरोपी सतत ठिकाण बदलून राहत होता. अखेर नवी मुंबई, दिल्ली असा पाठलाग करत पोलिसांनी आरोपी पतीला चेन्नईमध्ये पकडला.

मानखुर्दला राहणाऱ्या अमोल पवार (36) याने त्याच्या पत्नीचा गळा दाबून खून केल्यावर पळ काढला. ही माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळताच उपायुक्त ढवळे यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. परंतु आरोपी सतत ठिकाण बदलून लपत होता. पण तरीही पोलिसांनी सातत्याने कसून माघ काढणे सुरूच ठेवले. आधी नवी मुंबईत तो असल्याचे समजले, त्यानंतर तो दिल्लीला गेल्याची माहिती मिळाली. पथक दिल्लीला गेले. पण तेथून अमोल सटकला होता.

दरम्यान तो चेन्नईत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तेथून पळून जाण्याची संधी न देता तत्काळ तेथे जाऊन त्याला उचलले. दारूच्या आहारी गेलेल्या अमोलने पत्नीला कायमचे संपवले. त्यानंतर स्वतःला वाचविण्यासाठी त्याने प्रचंड आटापिटा केला. पण परिमंडळ-6मधील विशेष पोलिसांच्या पथकाने नवी मुंबई, दिल्ली, चेन्नई असा पाठलाग करत त्याला पकडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;