नक्की नवरा कोण आहे? मंदिरात नागार्जुनने सुनेसोबत असं काय केलं? नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल

नक्की नवरा कोण आहे? मंदिरात नागार्जुनने सुनेसोबत असं काय केलं? नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल

नुकताच नागा चैतन्य आणि शोभिता यांचे लग्न अगदी थाटामाटात पार पडले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली. यांच्या लग्नानंतर नागार्जुन यांनी लेकासाठी आनंदही व्यक्त केला होता. तसेच सूनेसाठी एक भावनिक पोस्टही लिहिली होती. पण आता लग्नानंतर नागा चैतन्य आणि सून शोभितासोबत नागार्जुन एका मंदिरात दर्शनासाठी गेले असताना त्यांनी जे केलं त्यावरून त्यांना प्रचंड
ट्रोल करण्यात येत आहे.

नागार्जुन यांच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले 

गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नापूर्वीचे विधी आणि लग्नाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पारंपारिक पद्धतीने नागा आणि शोभिताचा विवाह सोहळा झाला. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये विवाहबद्ध झाले.

त्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे श्रीशैलम, आंध्र प्रदेशमधील मल्लिकार्जुन मंदिरात त्यांच्या लग्नाच्या एका दिवसानंतर आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. नागार्जुनही या जोडप्यासोबत होते. मंदिरातील त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. व्हिडीओंमध्ये या जोडप्यासोबत नागार्जुनही पूजा करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील एका क्षणाने मात्र लोकांचे लक्ष वेधून घेतलं.

सुनेच्या खांद्यावरील केस बाजूला सारल्याने ट्रोल 

व्हायरल व्हिडीओमध्ये नागार्जुन, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला पुजाऱ्यासमोर डोके टेकवताना दिसत आहे. पुजारी त्यांना हळद, चंदन आणि फुलांनी बनवलेले ताट देतात, जेणेकरून ते स्वत:ला टिळा लावतील. पहिल्यांदा पुजारी नागार्जुनच्या कपाळावर चंदन लावतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Galatta India (@galattaindiaoffl)

त्यानंतर शोभिताला ते चंदन लावण्यास सांगतात. त्यावेळी शोभिता चंदन लावत असताना तिचे मोकळे केस खांद्यावरुन पुढे येतात. तेव्हा नागार्जुन शोभिता चंदन लावेपर्यंत केस मागे धरुन ठेवतो. हे पाहून नेटकऱ्यांनी नागार्जुन यांना ट्रोल केलंय. मात्र काहींनी त्यांचं कौतुकही केलं आहे.

“नक्की नवरा कोण”, नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल

व्हायरल व्हिडीओवर एका चाहत्याने लिहिलंय की, “सासरा सुनेच्या केसांना असा कसा हात लावू शकतो?”, तर एकानं लिहिलं आहे “नक्की नवरा कोण आहे?”,तर एकाने लिहिले आहे की “नागार्जुन सरांनी केलेली कृती चुकीची ठरत आहे” अशा अनेक कमेंट येत असून नेटकऱ्यांनी नागार्जुन यांचे हे वागणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर. काहींनी मात्र त्यांचे कौतुक केले आहे, एका युजर्सने कौतुक करत म्हटलं आहे,”ते तिच्या वडिलांसारखा आहे आणि ते तिची काळजी घेत आहेत.’ आणखी एका युजरने लिहिलंय, ‘मला नागार्जुन खूप आवडतात.’ तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘ही कृती सुनेचा आदर आणि काळजी देखील दर्शवते.’

दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;