जगदीप धनखड यांच्याविरोधात काँग्रेस राज्यसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार, समाजवादी पक्ष आणि टीएमसीचा पाठिंबा

जगदीप धनखड यांच्याविरोधात काँग्रेस राज्यसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार, समाजवादी पक्ष आणि टीएमसीचा पाठिंबा

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातील तापमान वाढलेलं दिसत आहे. दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांचा आणि खासदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. याचदरम्यान आता विरोधी पक्ष इंडिया आघाडी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात इंडिया आघाडी एकत्र आली असून समाजवादी पक्ष (SP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) देखील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस घेऊन येत असलेल्या या अविश्वास ठरावावर टीएमसी आणि सपा खासदारांनीही स्वाक्षरी केल्या आहेत, अशी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडी मंगळवारी राज्यसभेत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकते. अविश्वास प्रस्ताव तयार असून त्यावर 70 सदस्यांनी स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी राज्यसभेत जॉर्ज सोरोस यांच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळात अध्यक्ष जगदीप धनखड यांची भूमिका पाहता काँग्रेस त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित मुद्द्यावरून राज्यसभेत सोमवारी ज्याप्रकारे गदारोळ झाला, त्यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे सदस्य अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या अध्यक्षांना हटवण्यासाठी प्रस्तावावर 50 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत. सभापती धनखड यांच्या विरोधातील ठरावावर 70 सदस्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;