आम आदमी पक्षाकडून दुसरी यादी जाहीर, अवध ओझा यांना उमेदवारी

आम आदमी पक्षाकडून दुसरी यादी जाहीर, अवध ओझा यांना उमेदवारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 20 उमेदवारांचे नाव आहे. पक्षात नव्यानेच सामील झालेले अवध ओझा यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मनीष सिसोदिया ज्या मतदारसंघातून निवडून आले होते, त्या मतदारसंघातून ओझा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ओझा यांना पटपडगंज तर मनीष सिसोदिया यांना जंगपुरा इथून उमेदवारी देण्यात आली आहे.


याशिवाय आपने नरेलातून दिनेश भारद्वाज, तिमारपूरहून सुरेंद्र पाव सिंह बिट्टू, आदर्श नगरहून मुकेश गोयल, मुंडकाहून जसबीर कारला, मंगोलपुरीहून राकेश जाटव तर चांदनी चौकातून पुनरदीप सिंह साहनी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रवेश रतन आणि जितेंद्र सिंह शंटी हे भाजप सोडून आपमध्ये सामील झाले होते. पक्षाने त्यांनाही उमेदवारी दिली आहे. प्रवेश रतन यांना पटेल नगर तर जितेंद्र सिंह यांना शाहदरातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;