Delhi Schools Bomb Threat: दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बची धमकी, पोलिसांचा तपास सुरू

Delhi Schools Bomb Threat: दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बची धमकी, पोलिसांचा तपास सुरू

दिल्लीतील शाळा, विमानतळ, हॉटेल्स आणि इतर ठिकाणी बॉम्बनं उडवण्याच्या धमक्या येण्याची मालिका संपण्याचे नावच घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून या धमक्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच पुन्हा एकदा दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी (9 डिसेंबर) सकाळी 7.00 च्या सुमारास एकूण 40 शाळांना धमकीचे मेल असून या संदर्भात पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीतील आरके पुरमच्या डीपीएस, पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूल, मदर मेरी स्कूलसह 40 शाळा व्यवस्थापनांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला. अशा घटना थांबवण्यासाठी 30,000 डॉलर्सची मागणी या मेलद्वारे करण्यात आली आहे. सकाळी 7 च्या सुमारास हा मेल आल्यामुळे तोपर्यंत मुले त्यांच्या वर्गासाठी शाळेत पोहोचली होती. मात्र धमकीचे मेल आल्यानंतर शाळेच्या अधिकाऱ्यांनी लगेचच मुलांना घरी पाठवून पोलिसांना याबाबत कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, याआधी देखील दिल्लीतील रोहिणी येथील एका खासगी शाळेला बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता. यानंतर दिल्ली अग्निशमन विभाग आणि बॉम्ब शोधक पथकाचे जवान तपासणीसाठी शाळेच्या कॅम्पसमध्ये पोहोचले. मात्र तपासादरम्यान धमकीची अफवा आढळून आली. रोहिणीतील शाळेला धमकीचा कॉल येण्याआधी प्रशांत विहार परिसरात कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता, त्यात एक जण जखमी झाला होता. या घटनेनंतर घटनास्थळी भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

दिल्लीत अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांकडून येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ‘दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची इतकी वाईट स्थिती दिल्लीच्या जनतेने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. अमित शहा यांनी येऊन दिल्लीतील जनतेला उत्तर द्यावे’, असे म्हणत अरविंद केजरिवाल यांनी अमित शहांना धारेवर धरले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;