कल्याणीनगर भागातील हॉटेलमध्ये चोरी, चार लाखांची रोकड लांबविली

कल्याणीनगर भागातील हॉटेलमध्ये चोरी, चार लाखांची रोकड लांबविली

पुणे शहरातील कल्याणीनगर भागातील हॉटेलच्या गल्ल्यातून तब्बल चार लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वीच या भागात रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार्‍या हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.

याबाबत नावरी हलधर सिंग (वय 38, रा. वडगाव शेरी-कल्याणीनगर रस्ता) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 3 डिसेंबर रोजी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कल्याणीनगर भागातील कॉर्निच टॉवर्स इमारतीत बनाना लिफ नावाचे हॉटेल आहे. फिर्यादी हे या हॉटेलमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून आहेत. हॉटेलच्या गल्ल्यात चार लाखांची रोकड ठेवण्यात आली होती. मंगळवारी (दि.3) रात्री हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दरवाज्यातून चोरटा आत शिरला. चोरट्याने गल्ला उचकटला. त्यानंतर गल्ल्यात ठेवलेली चार लाखांची रोकड चोरुन चोरटा पसार झाला. रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधीत हॉटेल मॅनेजरने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कल्याणीनगर भागात हॉटेलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. दोन दिवसांपुर्वीच रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार्‍या येथील दोन हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर आता या भागात चोरीची घटना समोर आली आहे. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत वर्दळ असलेल्या या भागात देखील चोरटे सक्रिय असल्याचे दिसून येते. येरवडा पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;