‘एक वक्त के बाद सब बोरिंग हो जाता है…’, धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य

‘एक वक्त के बाद सब बोरिंग हो जाता है…’, धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य

Hama Malini – Dharmendra: अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र बॉलिवूडच्या आयकॉनिक कपल पैकी एक आहेत. ‘राजा जानी’, ‘शोले’ आणि ‘दोस्त’ अशा अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर करत दोघांनी चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. त्यानंतर हेमा आणि धर्मेंद्र यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र 1970 पासून एकत्र होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 1980 मध्ये लग्न केलं. पण एका मुलाखतीत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं. ‘एका वेळेनंतर सर्वकाही बोरिंग वाटू लागतं…’ असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.

सांगायचं झालं तर, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ईशा देओल हिने आई – वडिलांबद्दल मोठं सत्य सांगितलं होतं. हेमा मालिनी फार वेळ फोनवर बोलत होत्या. ईशा म्हणाली, ‘आई फोनवर बाबांसोबत बोलत होती. अचानक आईच्या घोरण्याचा आवज वडिलांना येऊ लागला…’ ईशाचा हा खुलासा ऐकून कपिलच्या शोमध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक हसू लागले…

 

 

यावर हेमा मालिनी म्हणाल्या, ‘तेव्हा काय झालं होतं मी सांगते, रात्रभर सिनेमाचं शुटिंग होतं. ज्यामुळे मी प्रचंड थकली होती. प्रेमाच्या गोष्टी एका ठराविक काळापर्यंत चांगल्या वाटतात. पण एका वेळेनंतर सर्वकाही बोरिंग वाटू लागतं…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची ‘लव्ह स्टोरी…’

1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुम हसीं मैं जवां’ सिनेमाच्या सेटवर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट झाली. त्यांची ऑन-स्क्रीन जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडली. पण जेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेमाच्या कुटुंबियांचा विरोध होता. मात्र, अनेक संकटांचा सामना केल्यानंतर दोघांनी लग्न केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;