हिट अँड रन प्रकरण, 25 वर्षीय अभिनेत्री गमावले प्राण, CCTV च्या मदतीने तपास सुरु

हिट अँड रन प्रकरण, 25 वर्षीय अभिनेत्री गमावले प्राण, CCTV च्या मदतीने तपास सुरु

Hit and Run Case: हिट अँड रन प्रकरणांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. आता देखील एका 25 वर्षीय अभिनेत्री आणि मॉडेलला हिट अँड रन प्रकरणात स्वतःचे प्राण गमवावे लागले आहेत. ज्यमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. वांद्रे येथे झालेल्या अपघातात 25 वर्षीय अभिनेत्री शिवानी सिंग हिला प्राण गमवावे लागले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी सिंग असे मॉडेलचे नाव आहे. ती तिच्या मित्रासोबत मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसली होती.

वांद्रे पश्चिम येथील आंबेडकर रोडवरील कलंत्री चौकातून जात असताना त्यांच्या दुचाकीला डंपर चालकाने धडक दिली. या घटनेत शिवानी डंपरच्या चाकाखाली आली तर तिचा मित्र काही अंतरावर पडला. दोघांनाही जखमी अवस्थेत भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात शिवानीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Singh (@shivani.singhh)

 

शिवानी कुठे राहत होती?

शिवानी मालाडमध्ये राहत होती आणि ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. तिच्या मित्राचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्रीच्या मित्राने हेल्मेट घातलं होतं. प्राथमिक तपासात अभिनेत्री मित्र दारूच्या नशेत नसल्याचं समोर आलं आहे. तपासात पोलिसांना नशेची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार डंपर चालकाचा शोध सुरू आहे. डंपर जप्त करण्यात आला आहे.

मुंबईत हिट अँड रन

सांगायचं झालं तर, मुंबई हिट अँड रन प्रकरणांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. ज्यामुळे शहरातील वाहतूक सुरक्षा आणि नियमांवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी लोकांनी आवाहन केलं आहे की वाहतुकीच्या नियमांचं पालन करा… अपघात झाल्यास तत्काळ पोलिसांना कळवा. एवढंच नाही तर, पोलिसांनी देखील आरोपीला लवकरच पकडून शिक्षा होईल असं सांगितलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;