दिग्दर्शक सुभाष घई लिलावती रुग्णालयात दाखल; ICU मध्ये उपचार सुरू, जाणून घ्या हेल्थ अपडेट्स..

दिग्दर्शक सुभाष घई लिलावती रुग्णालयात दाखल; ICU मध्ये उपचार सुरू, जाणून घ्या हेल्थ अपडेट्स..

प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई यांना शनिवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याबरोबरच त्यांच्या बोलण्यात अडचण होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घई यांना शुक्रवारपासूनच हा त्रास होत होता. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. लिलावती रुग्णालयात सुभाष घई यांच्यावर डॉ. रोहित देशपांडे यांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. घई यांच्या पीआर टीमकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली आहे. “सुभाष घई हे पूर्णपणे ठीक आहेत. त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती ठीक आहे”, असं पीआर टीमकडून सांगण्यात आलं आहे.

हेल्थ अपडेट

मेंदू, छाती आणि ओटीपोटीच्या संदर्भातील काही तपासण्या तसंच आवश्यक रक्त तपासण्या करण्यात आले आहेत. मानेच्या अल्ट्रासाऊंडने हायपोइकोइक मार्जिनसह थायरॉइटाइटिसचं निदान केलं आहे. तसंच सोमवारी त्यांचे पेट सीटी स्कॅन (PET-CT scan) करण्यात येणार असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. सुभाष घई यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने 2011 मध्ये पेसमेकर बसविण्यात आलं होतं. तसंच नुकत्याच करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना हायपोथारॉईडीझमचंही निदान झालं होतं.

सुभाष घई यांनी ‘कालीचरण’, ‘कर्ज’, ‘हिरो’, ‘विधाता’, ‘मेरी जंग’, ‘कर्मा’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘खलनायक’, ‘परदेस’ आणि ‘ताल’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. ते 79 वर्षांचे आहेत. नव्वदच्या दशकात ते लोकप्रिय दिग्दर्शक होते. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 16 चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. त्यापैकी बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. त्यांच्या काही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. ते ‘ऐतराज 2’ आणि ‘खलनायक 2’ या दोन चित्रपटांवर सध्या काम करत आहेत. हे दोन्ही सीक्वेल बनवण्याबद्दल त्यांनी त्यांचे विचार मांडले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;