Mumbai Hit & Run : भरधाव टँकरची दुचाकीला धडक, 25 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू

Mumbai Hit & Run : भरधाव टँकरची दुचाकीला धडक, 25 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू

मुंबईत पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. वांद्रे परिसरात भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने 25 वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाला. वांद्रे येथील आंबेडकर रोडवर शुक्रवारी रात्री ही घटना घडली. शिवानी सिंह असे मयत मॉडेलचे नाव आहे. घटनेनंतर टँकर चालक फरार आहे.

शिवानी तिच्या मित्रासह दुचाकीवरून वांद्र्याच्या दिशेने चालली होती. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला भरधाव टँकरेने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की शिवानी हवेत उडून टँकरच्या चाकाखाली आली. यामुळे ती गंभी जखमी झाली.

शिवानी जखमी अवस्थेत तात्काळ भाभा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघातानंतर टँकर चालकाने तेथून पळ काढला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या शोधासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;