बांगलादेशात कट्टरपंथियांकडून इस्कॉन मंदिरावर पुन्हा हल्ला, तोडफोड आणि आग

बांगलादेशात कट्टरपंथियांकडून इस्कॉन मंदिरावर पुन्हा हल्ला, तोडफोड आणि आग

बांगलादेशातील हिंदुंवरील हिंसाचार थांबण्याचे नावच घेत नाही. कट्टरपंथियांकडून हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात येत आहे. ढाका जिल्ह्यातील नमहट्टा इस्कॉन मंदिरावर शुक्रवारी पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे. इस्कॉन मंदिरात तोडफोड करत आग लावण्यात आली. मंदिरातील लक्ष्मी नारायण मूर्तीचे दहन करण्यात आले असून उर्वरित साहित्यही जळून खाक झाले आहे, असा आरोप इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी केला आहे. समाजातील सदस्यांवर आणि वैष्णव धर्माच्या सदस्यांना सातत्याने लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ले सुरू आहेत, असेही दास पुढे म्हणाले.

दास यांनी आपल्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बांगलादेशमध्ये इस्कॉन नमहट्टा सेंटर जळून खाक झाले. श्री श्री लक्ष्मी नारायण यांची मूर्ती आणि मंदिरातील सर्व वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. ढाका जिल्ह्यातील तुराग पोलिस स्टेशनच्या अखत्यारीतील धुर गावातील हरे कृष्ण नमहट्टा अंतर्गत येणाऱ्या श्री श्री राधा कृष्ण मंदिर आणि श्री श्री महाभाग्य लक्ष्मी नारायण मंदिराला शनिवारी पहाटे 2-3 वाजण्याच्या दरम्यान आग लावण्यात आली.”

सदर हल्ल्यांकडे अंतरिम सरकारचे लक्ष वेधूनही पोलीस आणि प्रशासनाला आपल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वारस्य नाही असा दावाही दास यांनी केला आहे. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. इस्कॉनशी संबंधित असलेल्या चिन्मय कृष्ण दासला अटक केल्यानंतर बांगलादेशातील वातावरण अधिकच चिघळले आहे.

संहिता सनातनी जागरण जोतशी संबंधित चिन्मय कृष्ण दास याला 25 नोव्हेंबर रोजी ढाका येथे ‘देशद्रोहाच्या’ आरोपाखाली अटक करण्यात आली होती. हिंदू समुदायाच्या रॅलीमध्ये चिन्मय दास आणि इतरांवर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक राजकीय नेत्याने केलेल्या तक्रारीनंतर चिन्मय दास यांना अटक करण्यात आली.

हिंदू समाजावर कट्टरतावाद्यांचे हल्ले वाढले आहेत. ज्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशमध्ये संयुक्त राष्ट्र शांती मिशन तैनात करण्याची विनंती केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;