‘तुझी किडनी बाळाचा भार…’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मातृत्त्वाच्या सुखासाठी झुरली; अखेर श्वानांचं मातृत्व स्विकारलं
सामान्य गृहीणी असो किंवा एखादी प्रसिद्धी सेलिब्रेटी शेवटी ती एक महिलाच असते. लग्नानंतर जवळपास सर्वच महिलांना ओढ असते ती आई होण्याची. मातृत्त्वाचं सुख हे प्रत्येक महिलेला हवंच असतं. पण जेव्हा त्याचसाठी संघर्ष करावा लागणार असेल तर तिला किती आणि कोणत्या परिस्थितीतून जावं लागत असेल याची कल्पना आपण करूच शकतो. अशीच एक प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे जिने मातृत्त्वाच्या सुखासाठी भरपूर संघर्ष केला.
नुकत्याच एका मुलाखतीत एका मराठी अभिनेत्रीनं मातृत्त्वाविषयीचं तिचं मत व्यक्त केलं आहे. सीआईडी, ‘कसम से’ अशा मालिका आणि गोलमाल सारख्य़ा हीट बॉलिवूड चित्रपटांमधून, मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी प्रसिद्धा अभिनेत्री अश्विनी काळसेकर.
अश्विनी काळसेकर यांच्या अभिनयाबद्दल, त्यांच्या कामाबद्दल सर्वांनाच माहित आहे.पण त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फार काही विशेष माहिती नाही. अश्विनी यांना त्यांच्या जीवनात मुख्य आव्हान होतं ते म्हणजे मातृत्वाचं. 2009 मध्ये तिनं अभिनेते मुरली शर्मा यांच्याशी लग्नगाठ बांधली.
15 वर्ष बाळासाठी संघर्ष
पण लग्नाला 15 वर्ष उलटूनही अश्विनीला मातृत्त्वाचं सुख मात्र मिळालं नाही. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपण कधीच आई होऊ शकत नाही, याबाबतचा खुलासाही केला.
एका महिलेसाठी गर्भधारणेचा निर्णय अतिशय महत्त्वाचा असून, असं न झाल्यास त्या महिलेच्या मानसिक आरोग्यावर याचा थेट परिणाम होतो असं मत अश्विनी यांनी व्यक्त केलं, तसेच त्या पुढे म्हमाल्या, “‘मी आणि मुरलीनं मुलांचा खूप विचार केला. आम्हाला बाळ हवं होतं. पण, मला किडनीचा त्रास आहे, ज्यामुळं कधीच माझी गर्भधारणा धाली नाही.’ यांची खंत त्यांनी व्यक्त केली.
सरोगसी पर्याय तेव्हा परवडणारा नव्हता
दरम्यान सरोगसी हा पर्याय तेव्हा इतका प्रचलित नसून,त्यावेळी आपल्याकडे तितके पैसेही नव्हते. त्यामुळं कारकिर्दीत तग धरला, संघर्ष केला आणि पुन्हा प्रयत्न केला. पण एका वळणार डॉक्टरांनी तुझी किडनी बाळाचा भार सोसू शकत नाही असं स्पष्ट सांगितल्याची कटू आठवण अश्विनी यांनी सर्वांसमोर सांगितली.
गर्भधारणेच्या प्रयत्नांदरम्यान बाळ किंवा आईला धोका असल्याचा इशारा अश्विनीला डॉक्टरांनी दिला होता त्यामुळे त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पतीनं बाळाचा विचार सोडला. बऱ्याचदा हा नशीबाचा भाग असतो, असही अश्विनी यांनी म्हटलं. तसेच आपल्याला स्वत:ची मुलं नसली तरीही दोन श्वानांचा ते मुलांप्रमाणेच सांभाळ करून त्यांनी त्यांच्यातच आपलं मातृसुख मान्य केलं आहे. हे स्वत: अश्विनी यांनी सांगितलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List