पंतप्रधान तुमच्या पक्षाचा गुंडा… विनेश फोगाटने बृजभूषण सिंह, भाजपला फटकारले

पंतप्रधान तुमच्या पक्षाचा गुंडा… विनेश फोगाटने बृजभूषण सिंह, भाजपला फटकारले

हिंदुस्थानच्या कुस्ती संघावर आमचाच कब्जा असल्याचा दावा कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूष सिंह यांनी केला आहे. त्यांच्य़ा या दाव्यावर काँग्रेसच्या आमदार व हिंदुस्थानच्या माजी कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत बृजभूषण सिंह व भाजपला फटकारले आहे.

विनेश फोगाट हिने बृजभूषण सिंह यांचा व्हिडीओ शेअर करत त्यासोबत एक पोस्ट लिहली आहे. ”पंतप्रधान तुमच्या पार्टीचा गुंडा सर्वांसमोर कुस्ती महासंघ त्याच्या ताब्यात असल्याचे सांगत आहे. तरिही तुमचे सरकार झोपून आहे व त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. भाजप तुला घाबरत असेल कारण तुझ्या सारख्यांना तेच आपल्याकडे आसरा देतात. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव बृजभूषण देवाची न्यायाची गिरणी ही धीम्या वेगाने दळते पण एकदम बारिक दळण दळते. देवाच्या दारात तुझा अंत दूर नाही. कुश्ती ही काही तुझे जहागिर नाही. आमच्या सारख्या हजारो कुस्तीपटूंनी आपल्या घाम व रक्ताने त्या कुस्तीला जोपासले आहे. त्याचा असा नाश होऊ देणार नाही, अशी पोस्ट विनेश फोगाटने शेअर केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;