2024 मध्ये ‘या’ सेलिब्रिटींच्या नात्याचा झाला अंत, कोणाचं ब्रेकअप तर कोणाचा घटस्फोट

2024 मध्ये ‘या’ सेलिब्रिटींच्या नात्याचा झाला अंत, कोणाचं ब्रेकअप तर कोणाचा घटस्फोट

Celebrities Divorce and Breakup: अनेक लोकं त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना आदर्श मानत असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात. पण 2024 मध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी जोडीदारासोबत ब्रेकअप तर काहींनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आज आपण जाणून घेऊ 2024 मध्ये कोणत्या सेलिब्रिटींचं ब्रेकअप झालं आहे आणि कोणाचा घटस्फोट…

ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष: साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांनी सोशल मीडियावर अधिकृतपणे घोषणा केली होती की ते दोघे आता वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि धनुषचं लग्न 2004 मध्ये झालं होतं. मात्र, 18 वर्षे एकत्र राहिल्यानंतर ते वेगळे झाले आहेत.

ए.आर. रेहमान आणि सायरा बानू : लग्नाच्या 29 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. खुद्दल ए. आर . रेहमान यांनी सोशल मीडियावर पत्नीपासून विभक्त होत असल्याची अधिकृत घोषणा केली. ए.आर. रेहमान आणि सायरा बानू यांचं लग्न 1995 मध्ये झालं होतं.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2024 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले.

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविक : 2024 वर्षाच्या सुरुवातीपासूनत हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. लग्नाच्या 4 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सतत रंगणाऱ्या चर्चांनंतर दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली.

ईशा देओल आणि भरत तख्तानी : हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचाही याच वर्षी घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघे वेगळे झाले. मात्र, त्यांच्या विभक्त होण्याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर : 2019 मध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली होती. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका – अर्जुन यांचं ब्रेकअप झालं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;