मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून आज विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय: नाना पटोले

मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून आज विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय: नाना पटोले

विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

विधानसभा परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी महाविकास आघाडीचे नेते भेट घेऊन पुढील रणनिती ठरवतील. भाजपा युतीचे सरकार हे जनतेचे सरकार नाही. मतांची चोरी करून आलेल्या सरकारने आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. तरुण मुले व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नागपूर भागात 773 शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्या पण भाजपा युतीला त्याचे काही देणेघेणे नाही त्यांनी सरकारचा शपथविधी सोहळा धुमधडाक्यात घेतला.

मारकरवाडीची लढाई…

लोकशाही व मताचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. मारकडवाडीतून जी ठिणगी पेटलेली आहे ती देशात पोहचवण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. यासंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या आंदोलनावर दिल्लीत तयारी सुरु आहे. सर्व तयारी झाल्यानंतर मारकडवाडीचे आंदोलन देशव्यापी करण्यासंदर्भात निर्णय होईल असेही नाना पटोले म्हणाले.

आयकर विभागाने जप्त केलेली अजित पवारांची 1 हजार कोटींची संपत्ती परत देण्याच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोलो म्हणाले की, ना खाऊंगा, ना खाने दुंगा ही भूमिका नरेंद्र मोदींच्या लोकांसाठी नाही. भाजपाबरोबर असलेल्या नेत्यांच्या भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न आहे असे पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;