आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता कशी सुटली? अजित पवार म्हणतात…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी गुरुवारी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला. 2023 मध्ये आयकर विभागाने 2023 मध्ये जप्त केलेली मालमत्ता जप्तीमुक्त करण्याचे दिल्लीतील ट्रिब्युनल कोर्टाने आयकर विभागाला दिले आहेत. त्याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता त्यांनी थेट नो कॉमेंट्स म्हटले.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शपथ घेतल्या. शपथ घेतल्यानंतर अजित पवार विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना त्यांची मालमत्ता मुक्त केल्याबाबत विचारले. त्यावर अजित पवार यांनी थेट नो कॉमेंट्स असे उत्तर दिले. मात्र पत्रकार त्यावर थांबले नाही. त्यातील एका पत्रकाराने पुन्हा एकदा तुम्ही भाजपसोबत गेला म्हणून तुमच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली का असे विचारले. यावर अजित पवारांनी सुरुवातीला मला त्या विषयी काहीच बोलायचे नाही. मी भाजपसोबत कधी गेलो त्याला दीड वर्ष झाले. दीड वर्षात काय झालं, विरोधकांनी जे काही आरोप केले ते खरे मानावे असे नाही, असे थातुर मातुर उत्तर दिले.
आयकर विभागाने अजित पवार यांची ही मालमत्ता 2023 मध्ये जप्त केली होती. यामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित मालमत्ताही होती. अजित पवारांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरू कमोडिटी, फायर पॉवर अॅग्रो फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ही मालमत्ता जप्तीमुक्त करण्याचे आदेश ट्रिब्युनल कोर्टाने शुक्रवारी दिलेले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List