Weather Update – थंडी गायब, हिवाळ्यात पावसाची एन्ट्री! पुढील तीन दिवस राज्याला ‘येलो अलर्ट’ जारी

Weather Update – थंडी गायब, हिवाळ्यात पावसाची एन्ट्री! पुढील तीन दिवस राज्याला ‘येलो अलर्ट’ जारी

महाराष्ट्रातील नागरिकांना गुलाबी थंडी अनुभवाच्या दिवसात पावसाळ्याचा आनंद घेताना दिसत आहे. डिसेंबर म्हणजे थंडीचे दिवस सुरू असताना गेले दोन दिवस राज्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता कधी थंडी तर कधी आभाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आता कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे आता पुढील तीन दिवस राज्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

गेले दोन दिवस राज्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे आता थंडीचा जोर कमी झाला आहे. पुढील 48 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 एवढा असेल. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील दोन दिवस हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. तर गोंदिया जिल्ह्यात चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे धान पिकाबरोबर भाजीपाला आणि तुर पिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बळीराज्याच्या सुखात मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;