EVM विरोधात वणवा पेटला! शरद पवार, राहुल गांधी मारकडवाडीला जाणार; आव्हाड म्हणाले, ‘ही ठिणगी…’

EVM विरोधात वणवा पेटला! शरद पवार, राहुल गांधी मारकडवाडीला जाणार; आव्हाड म्हणाले, ‘ही ठिणगी…’

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ झाला असल्याचा आरोप मारकडवाडी ग्रामस्थांनी केला होता. या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले होते. मात्र पोलिसांनी ही प्रक्रिया हाणून पाडली. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यासह जवळपास 100 ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे ईव्हीएमविरोधातील लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मारकडवाडीला भेट देणार आहे. यामुळे ईव्हीएमविरोधातील लढ्याला धार येणार आहे. शरद पवार यांच्या मारकडवाडी दौऱ्याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली.

जितेंद्र आव्हाड म्हणतात की, ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची ही कृती राज्यभरात खदखदत असणारा ईव्हीएमविरोधी असंतोषाला अजूनच चालना देणारा ठरेल यात वाद नाही.परिणामी संपूर्ण राज्यात “मारकडवाडी पॅटर्न” राबवायला सुरुवात होईल, याची मला खात्री आहे.

मारकडवाडीतून राहुल गांधी काढणार लाँग मार्च, ईव्हीएमविरोधात वणवा पेटला

येत्या रविवारी (8 डिसेंबर) आदरणीय पवार साहेब मारकडवाडी ला भेट देणार आहेत. राहुल गांधी देखील ईव्हीएमविरोधात लाँगमार्च मारकडवाडी येथूनच काढणार आहेत. लोकशाहीला मारक ठरणाऱ्या ईव्हीएमविरोधातील ही ठिणगी देशभर पसरो. क्रांतीचा एल्गार एल्गार होवो, असेही आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;