समायरा 18 व्या वर्षी झाली पायलट
On
कर्नाटकातील विजयपूर येथील अवघ्या 18 वर्षीय समायरा हुल्लूर ही तरुणी व्यावसायिक पायलट बनली आहे. कमी वयात पायलट बनण्याच्या विक्रमाला तिने गवसणी घातली आहे. समायरा ही उद्योगपती अमीन हुल्लूर यांची कन्या आहे. समायरा हिला व्यावसायिक पायलट परवाना मिळाला आहे. व्यावसायिक पायलट लायसन्स मिळवणारी ती देशातील सर्वात तरुण पायलट ठरली आहे. समायराने विनोद यादव एव्हिएशन अकादमीत सहा महिन्यांचे विमान चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List