‘एनडीए’मध्ये धुसफुस, आसाममधील बीफबंदीला नितीश कुमारांच्या ‘जेडीयू’चा विरोध

‘एनडीए’मध्ये धुसफुस, आसाममधील बीफबंदीला नितीश कुमारांच्या ‘जेडीयू’चा विरोध

केंद्रात भाजपच्या सत्तेला ‘टेकू’ देणाऱ्या  नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने आसाममधील बीफबंदीला विरोध केल्याने ‘एनडीए’मध्ये धुसफुस सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ‘जेडीयू’ने याआधी शेतकऱयांच्या मुद्दय़ावरही केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे आता ‘एनडीए’ आणि मित्रपक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

आसाममधील हिमंता बिस्व सरमा सरकारने राज्यात ‘बीफ बॅन’चा निर्णय घेतला आहे. याला ‘जेडीयू’ने जाहीर विरोध करताना ‘राजधर्मा’ची आठवण करून दिली आहे. आसाममधील बीफ बंदीचा निर्णय दुर्दैवी असून नागरिकांना खाण्यापिण्याचे स्वातंत्र्य हवे, अशी भूमिका ‘जेडीयू’ने घेतली आहे. हा निर्णय ‘राजधर्मा’विरोधातील असून समजण्यापलीकडला असल्याचे जेडीयूने म्हटले आहे. लोक काय खातात आणि कोणते कपडे घालतात याच्याशी सरकारचा काय संबंध, असा सवाल जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी केला आहे.

शेतकऱयांना दिलेली आश्वासने पूर्ण का केली नाहीत?

नितीशकुमार यांच्या जेडीयूने केंद्र सरकारला अनेक वेळा विरोध केला आहे. अलीकडेच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून तटस्थ भूमिका घेतली होती. उत्तर प्रदेशातील कावड यात्रेदरम्यान दुकानांवर नामफलक लावण्याच्या योगी सरकारच्या निर्णयाचाही विरोध केला होता. विशेष म्हणजे राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण का करीत नाही, असा सवाल केला असता जेडीयूने त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;