पब्जी खेळण्यापासून सासूने रोखताच सुनेने घर सोडले, बंदी असूनही गेमची क्रेझ कायम
गेल्या काही काळापासून पब्जी गेमचे व्यसन तरुणाईमध्ये वाढत आहे. या गेममुळे अनेकांनी आपले आयुष्य संपवले आहे, तर काहींनी घर सोडले आहे. हरयाणाच्या जींद जिल्ह्यातील मनोहरपूर गावात अशीच एक घटना समोर आली. सासूने आपल्या सुनेला पब्जी गेम खेळण्यापासून रोखले. त्यामुळे रागावलेल्या सुनेने घर सोडले. बराच काळ शोध घेऊनही महिलेचा शोध लागला नाही. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेला पबजी गेम खेळण्याची आवड होती, मात्र तिच्या सासूने तिला हा गेम खेळण्यास मनाई केली होती. या किरकोळ वादानंतर ही महिला रागाच्या भरात घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही.
पतीने पोलिसांना सांगितले की, 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास पत्नीने घराच्या भिंतीवरून उडी मारली आणि निघून गेली. तेव्हापासून तिचा शोध लागत नाही.
या घटनेनंतर पतीने पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कुठेही सापडली नाही. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी महिलेचा शोध सुरू असल्याचे सांगितले. स्थानिक लोकांकडेही चौकशी केली जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List