पीजी मेडिकल कोर्ससाठी सरकारचे धोरण योग्य; राज्य कोट्यातून प्रवेशाबाबत न्यायालयाचा निर्णय

पीजी मेडिकल कोर्ससाठी सरकारचे धोरण योग्य; राज्य कोट्यातून प्रवेशाबाबत न्यायालयाचा निर्णय

महाराष्ट्रातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (पीजी मेडिकल कोर्स) प्रवेशासंबंधी राज्य सरकारचे धोरण उच्च न्यायालयाने योग्य ठरवले आहे. महाराष्ट्राबाहेर एमबीबीएस पदवी प्राप्त केलेल्या स्थानिक उमेदवाराला महाराष्ट्रात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य कोट्यात पात्र होण्याकरिता त्या उमेदवाराने कोणतेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स किंवा केंद्र सरकारच्या संस्थेत एमबीबीएससाठी ‘ऑल इंडिया कोटय़ा’तून प्रवेश घेतलेला असावा, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या आणि तामीळनाडूतील कॉलेजमधून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थिनीने हायकोर्टात याचिका दाखल करून ‘नीट-पीजी-2024’ या धोरणाला आव्हान दिले होते. तिने याचिकेद्वारे केलेला दावा न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठाने अमान्य केला आणि सरकारचे धोरण योग्य ठरवत याचिका फेटाळली. या प्रकरणात विद्यार्थिनीतर्फे अॅड. व्ही. एम. थोरात, अॅड. पूजा थोरात, सरकारतर्फे अॅड. ज्योती चव्हाण, राज्य प्रवेश नियामक प्राधिकरण व एंट्रन्स टेस्ट सेलतर्फे अॅड. मेघना गोवलानी यांनी बाजू मांडली.

‘नीट-पीजी-2024’ धोरणातील अटी

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्याही उमेदवाराने महाराष्ट्रात मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेज वा संस्थेतून एमबीबीएसची पदवी तसेच एक वर्षाचे इंटर्नशिप ट्रेनिंग पूर्ण केलेले असावे.

महाराष्ट्रातील रहिवाशी आणि महाराष्ट्राबाहेरील कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी प्राप्त केलेल्या उमेदवाराला महाराष्ट्रातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य कोटय़ातून पात्र होण्यासाठी संबंधित उमेदवाराने कोणतेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ऑल इंडिया मेडिकल सायन्सेन्स इन्स्टिटय़ूट किंवा पेंद्र सरकारच्या कोणत्याही संस्थेत एमबीबीएससाठी ‘ऑल इंडिया कोटय़ा’अंतर्गत प्रवेश घेतलेला असावा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;