डॉ. श्रीकर परदेशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्त

डॉ. श्रीकर परदेशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्त

गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता त्यांच्या सचिवपदी डॉ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी हे 2001 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.

श्रीकर परदेशी हे जून 2021 मध्ये पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्रात परतले होते. तेव्हा त्यांच्याकडे सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची नियुक्ती करण्यात आली होती. 2022 साली देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हा श्रीकर परदेशी यांची नियुक्ती फडणवीस यांच्या सचिवपदी करण्यात आली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;