आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त, अजित पवारांना मोठा दिलासा

आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त, अजित पवारांना मोठा दिलासा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने अजित पवार यांची मालमत्ता जप्त केली होती. ही मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

आयकर विभागाने अजित पवार यांच्यांशी संबंधित निबोध ट्रेडिंग गुरु कमोडिटी, फायर पॉवर अ‍ॅग्री फार्म आणि स्पार्कलिंग सॉईल कंपनी संबंधीत मालमत्ता जप्त केली होती. फक्त अजित पवारच नाही तर त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्यांशी संबंधितही मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली होती. आता दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने आदेश दिल्यानंतर ही मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे.

2023 साली अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांसंबंधित आयकर विभागाने ही मालमत्ता जप्त केली होती. ही कारवाई स्थगित करावी अशी याचिका अजित पवार आणि कुटुंबीयांनी कोर्टाकडे केली होती. आता दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाने ही मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबतच पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना दिलासा मिळाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;