खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने शिक्षकाचा मृत्यू, वृद्ध जखमी

खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने शिक्षकाचा मृत्यू, वृद्ध जखमी

खिशात ठेवलेल्या मोबईलचा स्फोट झाल्याने एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोंदियात घडली. या स्फोटात शिक्षकाच्या शेजारी असलेली वृद्ध व्यक्ती जखमी झाली आहे. जखमी वृद्धावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेश संग्रामे असे मयत शिक्षकाचे तर नत्थु गायकवाड असे जखमी वृद्धाचे नाव आहे. मयत शिक्षक आणि जखमी वृद्ध दोघेही नातेवाईक आहेत.

साकोला तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी असलेले शिक्षक संग्रामे आणि गायकवाड हे नातेवाईकाकडे कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडे निघाले होते. यावेळी संग्रामे यांनी आपला मोबाईल खिशात ठेवला होता. नातेवाईकाकडे जात असताना संग्रामे यांच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटात गंभीर जखमी झाल्याने संग्रामे यांचा मृत्यू झाला. तर संग्रामे यांच्या शेजारी असलेले गायकवाड हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;