संबित पात्राच्या पक्षाचे पूर्वजच खरे गद्दार आणि देशद्रोही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानीच्या भ्रष्टाचारावर चौकशी करण्याची मागणी करताच अदानीचे दलाल राहुल गांधींची बदनामी करु लागले आहेत असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच जेव्हा जेव्हा अदानीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केले जाते तेव्हा तेव्हा अदानीचे दलाल भाजपाचे नेते काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बेछुट आरोप करतात. आताही भाजपाचा टुकार खासदार संबित पात्राने राहुल गांधी यांना देशद्रोही व गद्दार म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पूर्वजच खरे गद्दार व देशद्रोही आहेत असेही नाना पटोले म्हणआले.
नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेसने मोठे योगदान दिले आहे. देश ब्रिटिशां विरोधात लढत होता, तेव्हा संबित पात्राच्या पक्षाचे पूर्वज ब्रिटीशांची साथ देत होते, हा इतिहास आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात अनेकदा तुरुंगवास भोगला, पंडित जवाहलाल नेहरु यांनी 11 वर्षे तुरुंगवास भोगला, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढून देश जोडण्याचे काम केले, त्यावेळी भारतीय जनता पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून देश तोडण्याचे पाप करत होता, अशा विभाजनकारी विचारसरणीचे लोकच देशाचे खरे गद्दार व देशद्रोही आहेत असे पटोले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण नसताना पाकिस्तानात ‘बिन बुलाये मेहमान’ म्हणून गेले व नवाज शरिफ यांची बिर्याणी खाऊन आले असे नाना पटोले म्हणाले. मोदी सरकारनेच पाकिस्तानच्या आयएसआय ला भारतात पायघड्या घातल्या ते देशद्रोही कृत्य नाही का? भारताविरोधात घातपाती कारवाया करणाऱ्या दहशवाद्याला भाजपाच्या वाजपेयी सरकारने कंधारला सुरक्षित सोडून दिले, त्याला देशद्रोही म्हणायचे नाही तर काय? याची उत्तरं भाजप व संबित पात्राने द्यावीत. संबित पात्रा याची राहुल गांधींवर बोलण्याची पात्रता नाही, पण ‘अदानी मोदी भाई भाई’ असल्यामुळे मालकाच्या इज्जतीखातर पात्रा बोलून गेला पण त्याला भाजपाचा खरा इतिहास माहित नसावा असेही नाना पटोले म्हणाले. आमच्या नेत्यांची बदनामी कराल तर त्याला जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही पटोलेंनी यांनी यावेळी दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List