माजी मंत्री आणि भाजप नेते मधुकर पिचड यांचे निधन, 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी मंत्री आणि भाजप नेते मधुकर पिचड यांचे निधन, 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी मंत्री आणि भाजप नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. गेले अनेक दिवस ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

मधुकर पिचड यांचा जन्म 1941 साली एका आदिवासी कुटुंबात झाला होता. 1961 साली त्यांनी अमृतसागर दुध संघाची स्थापना केली होती. 1972 साली ते पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. अकोले तालुक्याच्या पंचायत समितीच्या संचालकपदी 1980 पर्यंत होते. 1980 साली काँग्रेसच्या तिकीटावर पिचड पहिल्यांदा आमदार झाले. आधी शरद पवार, नंतर विलासराव देशमुख आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आदिवासी मंत्रालय सांभाळलं. 1999 ला पिचड हे शरद पवार यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. 1980 ते 2009 पर्यंत आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर सात टर्म ते अकोले विधानसभेचे आमदार होते. 2019 साली त्यांना पुत्र वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;