Farmers Protest – शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळाकांड्या फोडणाऱ्या मोदी सरकारचा निषेध, राहुल गांधी यांचा संताप

Farmers Protest – शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळाकांड्या फोडणाऱ्या मोदी सरकारचा निषेध, राहुल गांधी यांचा संताप

शेतमालाला किमान आधारभूत किंमत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ म्हणत आंदोलन पुकारले. पण शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आपल्या मागण्या मांडण्यासाठी आणि आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांना दिल्लीत यायचे आहे. पण तुम्ही त्यांच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडताय आणि वेगवेगळ्या मार्गाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताय, हे निषेधार्ह आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या गंभीरतेने समजून घेतल्या पाहिजे, असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

देशात आज प्रत्येक तासाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे. यावरून शेतकऱ्यांच्या वेदनांचा अंदाज येऊ शकतो. मोदी सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे यापूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान 700 हून अधिक शेतकऱ्यांनी बलिदान दिले. त्यांचे बलिदान देश विसरणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

आम्ही शेतकऱ्यांची पीडा जाणतो आणि त्यांच्या मागण्यांचे समर्थन करतो. एमएसपीला कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेती खर्चाच्या 1.5 पट एमएसपी, कर्जमाफीसह सर्व मागण्यांवर सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

‘मोदीजी संसदेत या…’

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. संसदेच्या अधिवेशनात या, अदानींच्या चौकशीला घाबरू नका, असा टोला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लगावला आहे.

राहुल गांधी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र सोडले आहे. मोदीजी संसदेत या, अदानींवरील चौकशीला घाबरू नका, असे राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;