विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला दिल्लीत धक्का, भाजप आमदाराचा आपमध्ये प्रवेश

विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला दिल्लीत धक्का, भाजप आमदाराचा आपमध्ये प्रवेश

पुढच्या वर्षी दिल्ली विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यापूर्वीच भाजपला धक्का बसला आहे. भाजप आमदार सुरेंद्र पाल बिटूट यांचा आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे. मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला असून बिट्टू हे भाजपचे दोन टर्म आमदार राहिलेले आहेत. बिट्टू दिल्लीच्या तिमारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. निवडणुकीच्या तोंडावर एका आमदाराने पक्ष सोडल्याने भाजपला धक्का बसला आहे.

गुरुवारी पद्मश्री जितेंद्र सिंह शंटी यांनी तर आज सुरेंद्र पाल सिंह बिट्टू यांनी आपमध्ये प्रवेश घेतला आहे. तर काही दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षेत शिकवणारे अवध ओझाही आपमध्ये सामील झाले होते.

पक्षात प्रवेश घेतल्यानंतर बिट्टू म्हणाले की आम आदमी पक्ष हा सामान्य माणसांची अडचण समजून घेणारा पक्ष आहे. यापुढे अरविंद केजरीवाल यांच्या खांद्याला खांदा मिळवून दिल्लीचा विकास करू असे बिट्टू म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;