रिझर्व्ह बँकेकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दोन लाख रुपयांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज
रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसी जाहीर केली आहे. या धोरणात शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता शेतकऱ्यांना कुठल्याही हमीविना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या कर्जावर शेतकऱ्यांना व्यजाही द्यावे लागणार नाहिये. पूर्वी दीड लाखांपर्यंत शेतकऱ्यांना हे कर्ज मिळत होतं. आता रिझर्व्ह बँकेने सलग 11 व्यांदा रेपो रेट जैसे थे ठेवले आहेत. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट 6.5 टक्क्यांवर राहणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशात एकीकडे महागाई वाढली आहे, तर दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे पूर्वी शेतकऱ्यांना विना हमी आणि बिन व्याजी दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होतं. आता त्यात वाढ होऊन दोन लाखांपर्यंत कर्ज घेता येणार असल्याचे दास यांनी सांगितले. कृषी श्रेत्रात 2010 साली विना व्याज कर्ज देण्याची सुरुवात झाली होती. 2019 साली कर्जाची रक्कम एक लाख 60 हजार करण्यात आली होती आता रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची सोय केली आहे. रिझर्व्ह बँक लवकरच यावरची अधिकृत सूचना जारी करेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List