दिल्लीत भाजपकडून मतं कापण्याचे षडयंत्र, अरविंद केजरीवाल यांचा आरोप
भाजप दिल्लीच्या मतदारांकडून मतदानाचा हक्क हिरावून घेत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. भाजप प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 6 टक्के मतं कापू पाहत आहे असेही केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात केजरीवाल म्हणाले की भाजप मतं कापण्यासाठी निवडणूक आयोगाकडे निवेदन देत आहे. प्रत्येक अर्जावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची सही आहे. भाजपने पक्षाच्या लेटरहेडवर निवडणूक आयोगाकडे हे पत्र दिले आहेत. शाहदरा विधानसभेबाबत भाजपने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. या विधानसभा मतदारसंघात 11 हजार 18 मतदार दुसरीकडे स्थायिक झाले आहेत किंवा त्यांचे निधन झाले आहे असा दावा भाजपने केला आहे. या सगळ्यांची चौकशी करणं कठीण आहे. पण जेव्हा आम्ही 500 मतदारांची चौकशी केला तेव्हा कळालं की 372 मतदार तिथेच राहतात.
यातील बहुतांश मतदार हे आम आदमी पक्षाचे आहेत असे केजरीवाल म्हणाले. शाहदरा विधानसभा निवडणुकीत 86 हजार मतदार आहेत, त्यापैकी भाजप 11 हजार मतदारांची नावं काढू पाहत आहेत जी सहा टक्के इतकी आहेत. या जागेवरून भाजपचा उमेदवार 5 हजार 294 मतांनी जिंकला होता. पण हे लोक 11 हजार मतदारांची नावं कापत आहे, तर निवडणुकीचा काय अर्थ राहिला? असेही केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल म्हणाले की अशा प्रकारे मतदारांची कपात करण्यासाठी भाजपने 11 हजार अर्ज दिले आहेत. पण निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 487 अर्ज दिसत आहेत. याचा अर्थ भाजपचे अर्ज आयोगाच्या वेबसाईटवर दाखवत नाहियेत. निवडणूक आयोगाने भाजपच्या सर्व अर्जांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत असेही केजरीवाल यांनी सांगितले.
तसेच हरयाणा आणि महाराष्ट्रात नेमकं काय झालं हे माहित नाही, पण तिथे काही तरी नक्की गडबड झाली असेही केजरीवाल म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List