सोलापुरातील हजारो महिलांना कोट्यवधीचा गंडा, पेन्सिल पॅकिंगच्या आमिषाने फसवणूक; अनामत रक्कम घेऊन समूहचालक गायब

सोलापुरातील हजारो महिलांना कोट्यवधीचा गंडा, पेन्सिल पॅकिंगच्या आमिषाने फसवणूक; अनामत रक्कम घेऊन समूहचालक गायब

जुनी मिल कंपाऊंड येथील दी स्क्वेअर मॉल येथे खुशी महिला गृहउद्योग समूहाच्या माध्यमातून पेन्सिल पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून प्रत्येक महिलेकडून 2100 रुपये घेऊन काही महिन्यांतच समूह चालकाने सोलापूर शहरातील सुमारे एक हजार महिलांना दोन ते तीन कोटींचा गंडा घातला. समूहचालक गाशा गुंडाळून फरार झाला आहे. यासंबधी महिलांनी फौजदार चावडी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.

सोलापूर शहरातील हजारो बेरोजगार महिलांना पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अनामत रक्कम म्हणून 2100 रुपये घेण्यात आले. पेन्सिल पॅकिंगला दोन हजार रुपये, पेन पॅकिंग दोन हजार रुपये, पापड उद्योग पाच हजार, भडंग पॅकिंग पाच हजार रुपये, मेणबत्ती पॅकिंगला दोन हजार, तर फरसाण आणि चिवडा पॅकिंगला पाच हजार रुपये, मसाला पॅकिंग पाच हजार रुपये, पाणीपुरी पॅकिंग पाच हजार रुपये, टिकली पॅकिंग दोन हजार रुपये, रब्बर पॅकिंग दोन हजार रुपये, अगरबत्ती पॅकिंग 2000, चॉकलेट पॅकिंग 5000 रुपये उद्योग समूहाच्या प्रमुखाने वसूल केले होते.

या बदल्यात एका महिलेला दररोज 200 रुपये वाटप केले जाईल, असे त्याने सांगितले. शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांकडून माल घेऊन या महिलांना दररोज पॅकिंगला दिला जात होता. त्यांच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील, असे आश्वासनही दिले होते. महिना पूर्ण झाल्यावर तुमचा हिशेब केला जाईल, असे सांगण्यात आले होते.

अनेक महिला दररोज रांगा लावून

पॅकिंगचा माल घेऊन जात होत्या. एकमेकांच्या ओळखीतून महिला येऊन पैसे भरत होत्या. गेले दोन महिने येथे गर्दी होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सदर गाळा बंद असल्याने महिलांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. पॅकिंग व्यवसाय चालवणारे संस्थाचालक रातोरात गायब झाले आहेत. अनेक महिला भरलेले पैसे घेण्यासाठी हेलपाटे मारत आहेत. मात्र, गाळा बंद असून चालकाने संपर्क नंबरही बंद केला आहे.

महिलांची फसवणूक करणाऱ्या संस्थाचालकाला अटक करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अनेक तक्रारदार महिलांनी केली आहे. खुशी महिला गृहउद्योग पुणे, मोबाईल नं. 9307622076 या नावाने महिलांना पावत्या दिल्या जात होत्या. सुमारे 1 हजारहून अधिक महिलांची अनामत रक्कम घेऊन संस्थाचालक फरार झाला असल्याचे उघडकीस आले आहे.

समूहचालकाचा शोध सुरू

अनेक महिलांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. याप्रकरणी समूहचालकाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. तर, पोलीस घटनास्थळावरून माहिती घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;