चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवरच, हिंदुस्थानचे साखळी सामने पाकिस्तानाबाहेर

चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवरच, हिंदुस्थानचे साखळी सामने पाकिस्तानाबाहेर

अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवरच खेळविली जाणार. गेले अनेक दिवस वादात अडकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचा मार्ग आयसीसीने मोकळा केला. त्यामुळे हिंदुस्थान आपले साखळी पाकिस्तानबाहेर खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफीचा नवा कार्यक्रम आयसीसी जाहीर करील.

गेले अनेक दिवस पाकिस्तान आपली ताठर भूमिका सोडत नव्हता. पण आज दुबईत झालेल्या अनौपचारिक बैठकीत पीसीबीने हायब्रिड मॉडेल स्वीकारले आहे. खुद्द आयसीसीने पीसीबीला सारंकाही मान्य करण्यास भाग पाडल्याचे सूत्रांकडून कळले आहे. त्यामुळे आगामी वर्षी होणाऱया चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम कार्यक्रम येत्या दोन-तीन दिवसांत क्रिकेटविश्वासमोर असेल.

पीसीबीने आधी हायब्रिड मॉडेलला स्पष्ट शब्दांत नकार देत ताठर भूमिका घेतली होती, मात्र आयसीसीच्या आक्रमक भूमिकेपुढे ते क्लिन बोल्ड झाले अन् त्यांना निमूटपणे हायब्रिड मॉडेल स्वीकारावे लागले आहे.

हायब्रिड मॉडेलमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतील 15 लढतींपैकी 5 लढती या संयुक्त अरब अमिरात (यूएई) किंवा कोलंबोमध्ये होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्याची फक्त औपचारिक घोषणा करणे शिल्लक आहे. यात हिंदुस्थानच्या तीन साखळी सामन्यांसह एक उपांत्य आणि अंतिम (हिंदुस्थानने आगेकूच केली तर) सामन्याचा समाकेश आहे. आयसीसी सदस्यांच्या बैठकीनंतर याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल.

‘पीसीबी’ने हायब्रिड मॉडेलच्या पार्श्वभूमीकर आयसीसीकडे 4-5 मागण्या केल्या होत्या. यात हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये खेळणार नसेल तर पाकिस्तानही हिंदुस्थानात खेळणार नाही. गट फेरीत हिंदुस्थानी संघ आमच्या गटात नकोय. हायब्रिड मॉडेलनुसार दुसऱया देशात होणाऱया पाच लढतींबद्दल आम्हाला आर्थिक नुकसानभरपाई मिळाकी, अशा अटींचा समाकेश होता. याबाबत आयसीसी गांभिर्याने विचार करत असल्यामुळे पीसीबीला काही प्रमाणात नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

हिंदुस्थानातील स्पर्धाही हायब्रिड मॉडेलवर

2027 सालापर्यंत आयसीसीच्या तीन स्पर्धा हिंदुस्थानात खेळविल्या जाणार आहे. या स्पर्धांतही हायब्रिड मॉडेलला आयसीसीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे पाकिस्तानचा संघ हिंदुस्थानात क्रिकेट सामने खेळणार नाही. पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी खेळविले जातील. पुढच्या वर्षी हिंदुस्थानात महिला वन डे वर्ल्ड कप आणि 2026 मध्ये श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदासह टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे.

जय शहा यांची आयसीसी मुख्यालयाला भेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नके बॉस म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर जय शहा यांनी गुरुकारी प्रथमच दुबईतील आयसीसी मुख्यालयाला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी आयसीसाच्या सदस्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आगामी कर्षी होणाऱया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीकर आयसीसीच्या बैठकीला केगळे महत्त्क प्राप्त झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;