अ‍ॅडलेड जिंकण्यासाठी दोघेही सज्ज, हिंदुस्थान मालिकेत आघाडी घेण्यासाठी तर यजमान बरोबरी साधण्यासाठी झुंजणार

अ‍ॅडलेड जिंकण्यासाठी दोघेही सज्ज, हिंदुस्थान मालिकेत आघाडी घेण्यासाठी तर यजमान बरोबरी साधण्यासाठी झुंजणार

पर्थ कसोटीपूर्वी हिंदुस्थानी संघात असलेले ढगाळ वातावरण पूर्णपणे बदललेय. कमकुवत भासणारा, मनोधैर्य खचलेल्या हिंदुस्थानी संघ आता सुसाट वेगान धावतोय. पर्थ कसोटीत हंगामी कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराने केलेली कामगिरी संस्मरणीय ठरलीय. पर्थ कसोटी जिंकून आघाडीवर असलेल्या हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व रोहित शर्माने हाती घेतलेय. पर्थ जिंकल्यानंतर ऍडलेडही जिंकण्यासाठी रोहितच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ पुन्हा सज्ज झालाय तर यजमान ऑस्ट्रेलियाने पर्थचा पराभव विसरून गुलाबी चेंडूच्या कसोटीत विजयाचा गुलाल उधळण्याचे ध्येय समोर ठेवलेय. कसोटी गुलाबी चेंडूची असली तरी थराराचे विविध रंग निश्चित पाहायला मिळावेत, ही क्रिकेटप्रेमींची माफक अपेक्षा आहे.

दोन आठवडय़ांपूर्वी हिंदुस्थानी संघ खचलेला, थकलेला भासत होता. न्यूझीलंडकडून मिळालेली 0-3 हार ही सर्वांच्याच जिव्हारी लागली होती. सर्वात मोठे दुःख होते ते म्हणजे न्यूझीलंडने हिंदुस्थानला घरात घुसून हरवले, पण पर्थ कसोटीने सारे चित्रच पालटवले आहे. हिंदुस्थानला 0-3 हा देऊन पर्थवर विश्रांती करत असलेल्या रोहित शर्माला आता एक आत्मविश्वासाने आणि आघाडीवर असलेला कणखर संघ लाभलाय. संघाच्या खेळाडूंची कामगिरी पाहून रोहितचा आत्मविश्वासही दुणावलाय. पर्थवर जसे संघहित जपले तसेच ऍडलेडवरही जपण्याचे संकेत रोहित आणि संघव्यवस्थापनाने दिलेय.

हेझलवूडच्या जागी बोलॅण्डच्या हाती चेंडू

अचानक संघाबाहेर फेकला गेलेल्या जॉश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलॅण्ड या 35 वर्षीय वेगवान गोलंदाजाची पुन्हा संघात वर्णी लागली आहे. मिचेल मार्शबाबत साशंकता होती, पण तो अंतिम संघात कायम असल्यामुळे पर्थ कसोटीत खेळलेले 10 खेळाडू गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात खेळतील.

हिंदुस्थानी संघ – के. एल. राहुल, यशस्वी जैसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, नितीश रेड्डी, हर्षित राणा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज. ऑस्ट्रेलियन संघ ः नॅथन मॅकस्विनी, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रव्हिस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, स्कॉट बोलॅण्ड.

यशस्वी-विराट विक्रमांच्या उंबरठ्यावर

यशस्वी जैसवालला ऍडलेडमध्येही मोठे शतक ठोकून अनेक विक्रमांना मागे टाकण्याची संधी आहे. तो अनेक विक्रमांच्या उंबरठय़ावर असल्यामुळे कोणत्या विक्रमांना आधी मोडतो, हे त्याची फलंदाजीच ठरवेल. तसेच विराट कोहलीलाही आपल्या शतकांची संख्या वाढवून अनेक विक्रमांनाही आपल्या नावावर करण्याची संधी लाभलीय. विराटला आता खऱया अर्थाने आपल्या आवडत्या ऑस्ट्रेलियात शतकांचा वर्षाव करणे शक्य आहे.

आता बॉर्डर-गावसकर करंडक जिंकायचेय

पॅट कमिन्सने आपल्या नेतृत्वाखाली वन डे वर्ल्ड कप, ‘ऍशेस’ मालिका आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद या मानाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याला फक्त अद्याप बॉर्डर-गावसकर (बॉगाक) करंडक जिंकता आलेले नाही. त्यामुळे ही मालिका जिंकून आपल्या जेतेपदाचा चौकोन कमिन्सला साकारायचाय. याच कारणास्तव त्याचा संघ ऍडलेड कसोटीत बरोबरी साधण्यासाठी उतरणार आहे. 2011 साली कसोटी पदार्पण करणाऱया कमिन्सला हिंदुस्थानविरुद्धचा पहिला कसोटी सामना 2017 साली खेळायला मिळाला. सध्या कसोटी संघात असलेल्या अनेक खेळाडूंना बॉर्डर-गावसकर करंडकाचे चुंबन घेता आलेले नाही. त्यामुळे आम्हां सर्व खेळाडूंचे एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे ही स्पर्धा जिंकणे, अशी इच्छा कमिन्सने कसोटीच्या पूर्वसंध्येला बोलून दाखवली.

यशस्वी-राहुलच सलामीला

रोहित आणि संघहित या नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे पर्थवर हिंदुस्थानी संघाला मिळालेली दमदार सलामी कर्णधार म्हणून रोहित विसरणार नाही, हे आधीच स्पष्ट होते. संघाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर रोहित कोणत्या स्थानावर खेळणार, हा प्रश्न साऱयांनाच भेडसावत होता, पण रोहितने या प्रश्नाचे उत्तर शोधले असून तो संघहितासाठी मधल्या फळीत खेळणार आहे. रोहितने नेहमीच संघहिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे यशस्वी आणि राहुल हेच सलामीला खेळतील. शुबमन आणि विराट आपल्याच स्थानावर पुन्हा दिसतील, मात्र रोहित पाचव्या स्थानावर मधल्या फळीला बळकटी देण्यासाठी उतरणार आहे. कारकीर्दीच्या प्रारंभी रोहित काही काळ मधल्या फळीत खेळला होता. या स्थानावरही त्याने तीन शतके ठोकली आहेत.

अश्विनच्या श्रेष्ठत्वाला मान

गेली दहा वर्षे हिंदुस्थानी क्रिकेटच्या गोलंदाजीचा भार उचलणाऱया रविचंद्रन अश्विनला अचानक पर्थ कसोटीत विश्रांती देण्याचा निर्णय काहींना पटला नव्हता. तसेही पर्थ कसोटीत वेगवान गोलंदाजांचीच चलती असते. त्याच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरची वर्णी लागली होती. मात्र ऍडलेड कसोटीत अश्विन पुन्हा दिसणार आहे. 105 कसोटी सामन्यांत 536 विकेट टिपणाऱया अश्विनला डावलल्यानंतर वॉशिंग्टनची कामगिरी सामान्य राहिल्यामुळे त्याला ऍडलेडमध्ये विश्रांती देणेच योग्य आहे. कसोटीच्या पूर्वसंध्येला अश्विनच्या पुनरागमनाचे संकेत मिळाले आहे. मात्र वेगवान गोलंदाजीत हर्षित राणाच्या जागी आकाशदीपला संधी मिळाली तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे पहिल्या कसोटीत होलसेल बदल असलेल्या हिंदुस्थानी संघात पुन्हा अनेक बदल दिसतील. देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेलला बसवून रोहित शर्मा आणि शुबमन गिल पुनरागमन करतील तर गोलंदाजीत वॉशिंग्टनची जागी अश्विन आणि हर्षितच्या जागी आकाशदीप हे बदल अपेक्षित आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;