फुरसुंगी ते दिवे घाटमार्गात रस्त्यांची चाळण, पाऊस थांबल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

फुरसुंगी ते दिवे घाटमार्गात रस्त्यांची चाळण, पाऊस थांबल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

पावसाळा संपून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी पालखी महामार्गावर पडलेले खड्डे ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. फुरसुंगी ते दिवे घाट भागात काही ठिकाणी रस्त्याची चाळण झाली असून, रस्त्यांना भलेमोठे खड्डे पडलेले आहेत. मोठमोठे खड्डे आणि या भागात होणाऱ्या सततच्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.

पुणे-सासवड महामार्गावर वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. पुरंदर तालुक्यामध्ये असलेले जेजुरी, नारायणपूर तसेच मोरगाव येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच शनिवार-रविवारी पर्यटनासाठी येणारे पर्यटकदेखील दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत फुरसुंगी भागात साडी गोदामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कमी किमतीत साड्या मिळत असल्याने अनेक ग्राहक लग्नबस्ता खरेदी किंवा सणानिमित्त साड्या खरेदीसाठी या गोदामांमध्ये मोठी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे या महामार्गावर सतत गर्दी असते.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फुरसुंगी ते दिवे घाट या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना गाड्या चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्या काळात तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवण्यात आले. काही खड्डे तर अनेक वेळा बुजवूनदेखील उपयोग होत नसल्याने असे भलेमोठे खड्डे ‘ब्लॉक’च्या साहाय्याने बुजवण्यात आले होते. या बुजवलेल्या खड्ड्यांतील डांबर निघून गेल्याने हे खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ स्वरूपात आले आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजवणार तरी कधी? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

रात्रीदेखील होते वाहतूककोंडी

फुरसुंगीचा उड्डाणपूल ते देवाची उरुळी या भागात काहीवेळा रात्रीदेखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. रात्री उशिरा अकरा वाजतादेखील या भागात वाहतूककोंडी होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सततची वाहतूककोंडी सोलापूरकडून साताऱ्याकडे किंवा साताऱ्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक या भागात सुरू असते. रस्त्यांना पडलेले मोठे खड्डे आणि भले मोठे ट्रक यामुळे या भागात सतत वाहतूककोंडी होत असते. त्यात फुरसुंगी येथील उड्डाणपूल हा अरुंद असल्याने या पुलावरदेखील सतत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. तसेच या भागात असलेल्या साड्यांच्या गोदामात खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यांवर बेशिस्तपणे गाड्या पार्क करत असल्यानेदेखील वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. तसेच काही बेशिस्त वाहनचालक रस्ता ओलांडत असताना गाड्या आडव्या घालत असल्यानेदेखील मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे.

पोलिसांवर अतिरिक्त ताण 

या भागात होणाऱ्या सततच्या वाहतूककोंडीमुळे पोलिसांना ऊन, वारा, पावसात थांबून वाहतूक सुरळीत करावी लागत आहे. अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने अशा वाहनांना वाट करून देतानादेखील पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;