बेकायदा शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; दिव्यातील विद्यार्थिनीच्या विनयभंगाला जबाबदार कोण?

बेकायदा शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; दिव्यातील विद्यार्थिनीच्या विनयभंगाला जबाबदार कोण?

दिव्यातील बेकायदा स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीचा एका विकृताने विनयभंग केल्याच्या संतापजनक घटनेनंतर शहरातील बेकायदा शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या विनयभंगाला जबाबदार कोण, असा थेट सवाल पालकांनी केला असून बेकायदा शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांना शिक्षण विभाग व महापालिका अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचे उघड झाले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 69 अनधिकृत शाळा असून त्यापैकी सर्वाधिक 61 एकट्या दिवा-मुंब्यात आहेत. दरम्यान विनयभंगाच्या घटनेस दोन दिवस उलटले तरी अजूनपर्यंत विकृताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

दिव्यातील स्मार्ट एज्युकेशन शाळेमध्ये पाचवीतील विद्यार्थ्यांच्या वर्गात कुणी नसल्याची संधी साधत एक अज्ञात विकृत इसम घुसला आणि त्याने चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणाचा भंडाफोड होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापनाने दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारानंतर दिवा-मुंब्यातील विद्यार्थी व पालकही धास्तावले असून आतापर्यंत शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता तिवारी यांचीच फक्त चौकशी केली आहे. शाळेचे संचालक मनीष तिवारी यांची पोलीस का चौकशी करीत नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

300 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

ज्या स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूलमध्ये विनयभंगाची घटना घडली ती शाळा आजपासून दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग येथे भरतात. एकूण 300 विद्यार्थी शिकत असून त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या अधिकृत शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी मेस्टा या संस्थेने पुढाकार घेतला आहे.

कारवाई नेमकी करायची कोणी?

बेकायदा शाळांना नोटिसा बजावून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पण प्रत्यक्षात ज्या इमारतीत या शाळा सुरू आहेत त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातोडा टाकलाच नाही. त्यामुळे शाळा कायमस्वरूपी बंद ठेवण्यासाठी कारवाई नेमकी कोणी करायची, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

ठाणे महापालिकेने जुलैमध्ये शहरातील सर्व 69 बेकायदा शाळांची यादी जाहीर केली होती. त्यात दिव्यातील स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूल 32 व्या क्रमांकावर होते.

या शाळेला पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याची नोटीस पाठवली होती. एवढेच नव्हे 97 हजारांचा दंडही ठोठावला. मात्र अजूनपर्यंत हा दंड भरला नसून शाळा सुरूच ठेवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालू ठेवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;