महाबळेश्वर, पाचगणीतील गुलाबी थंडीला ब्रेक, ढगाळ वातावरणामुळे उकाड्याचे वातावरण

महाबळेश्वर, पाचगणीतील गुलाबी थंडीला ब्रेक, ढगाळ वातावरणामुळे उकाड्याचे वातावरण

महाबळेश्वर, पाचगणीतील गुलाबी थंडीला सध्या ब्रेक मिळाल्याचे दिसत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील तापमान सात अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली असले, तरी थंडी गायब होऊन त्याऐवजी उकाड्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

पर्वतीय क्षेत्रातील थंडगार हवा आणि गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात महाबळेश्वर आणि पाचगणीला भेट देतात. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हवा उष्ण झाली आहे. ज्यामुळे थंडीची अनुभूती घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

सध्या ढगाळ वातावरणामुळे थोडी उष्णता निर्माण झाली आहे. चार ते पाच दिवसांपूवीं  कमालीची थंडी आणि आता उष्णता अशा बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप व खोकल्याचे  रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांच्या गर्दनि येथील  दवाखाने फुल्लं होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या संसर्गजन्य आजारांना रोखण्याबरोबर  या बदलत्या वातारणात नागरिकांनी आपल्या  आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

शेकोट्या विझल्या अन् फॅन सुरू गेल्या आठवड्यात कमालीच्या थंडीमुळे महाबळेश्वर, पाचगणी चांगलेच गारठे होते. या थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकाट्या पेटावल्या जात होत्या. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांत ढगाळ हवामानामुळे वातावरण पूर्णतः बदलले आहे. आता उष्णता जाणवत असल्याने येथे घरोघरी फॅन, कुलूर सुरू झाले आहेत.

पिकांना फटका 

थंडी अचानक गायब होऊन आता ढगाळ वातावरण होत आहे. या हवामानाचा स्ट्रॉबेरी आणि इतर बागायती पिकांवर परिणाम होत आहे. विशेषतः स्ट्रॉबेरीच्या फळांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वातावरणामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्हीवर परिणाम होण्याची भीती आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, वातावरणातील बदलामुळे पुढील काही दिवसांमध्ये अधिक समस्या निर्माण होऊ शकतात.

महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत कडाक्याची थंडी पुन्हा येऊ शकते, असे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;