अब्दुल सत्तार यांच्या संस्थेची चौकशी करा; वायुसेना अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अब्दुल सत्तार यांच्या संस्थेची चौकशी करा; वायुसेना अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

भारतीय सैन्य दलातील दसैनिक योगेश अप्पाराव गोराडे यांनी दिलेल्या तक्रारीवर वायुसेना विभागातील लेफ्टनंट कर्नल बॅटरी कमांडर यांनी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना अब्दुल सत्तार यांची शैक्षणिक संस्था नॅशनल एज्युकेशन सोसायटी मार्फत बळकावलेल्या प्लॉटबावत चौकशी करण्यासाठी पत्र दिले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

एकीकडे आत्ताच कसेबसे निवडून आलेले आमदार अब्दुल सत्तार मंत्रीपदासाठी मुंबईत जोर लावत असताना, दुसरीकडे वादग्रस्त व कलंकित माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळात अजिबात स्थान देणार नाही, अशी भाजपने भूमिका घेतली आहे. अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अब्दुल सत्तार आता प्रचंड मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अगोदरच मंत्रीपदाचे स्थान धोक्यात आलेले असताना आता त्यांची मंत्रिपद मिळण्याची शक्यताच मावळताना दिसत आहे.

सैनिक योगेश गोराडे यांच्या तक्रार प्रकरणातील माहिती अशी की, त्यांचे वडील (रा. निल्लोड, तालुका सिल्लोड) अप्पाराव गोराडे यांनी 2008 साली सिल्लोड येथे सर्व नंबर 92 मध्ये प्लॉट क्रमांक 85 क्षेत्रफळ 125.26 चौरस मीटर नोंदणीकृत दस्तद्वारे खरेदी केला होता. मालकी हक्काचे संपूर्ण कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत.

अब्दुल सत्तार हे कॅबिनेट कृषीमंत्री असताना त्यांनी सिल्लोड शहरात महाराष्ट्र कृषी महोत्सव साजरा केला होता. हा महोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी सिल्लोड येथील सव्र्व्हे नंबर 90, 91 व 92 जागेची निवड केली होती. त्यावेळेस त्यांनी 2022 डिसेंबर महिन्यात संपूर्ण जमिनीचे सपाटीकरण केले होते.

महाराष्ट्रातील मोठा कृषी महोत्सव सिल्लोड येथे साजरा होत असल्याने कोणत्याही मालमत्ता धारकाने त्याचा विरोध केला नाही. जानेवारी 2023 मध्ये कृषी महोत्सव पार पडला, परंतु अब्दुल सत्तार यांनी जमिनीवरील केलेले तात्पुरते कंपाउंड, शेड इत्यादी हटवले नाही. आणि अचानक तीन महिन्यांनंतर तिथे नॅशनल एज्युकेशन सोसायटी या त्यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत प्रचंड मोठे हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यात अप्पाराव गोराडे यांचा प्लॉट सुद्धा समाविष्ट होता.

अप्पाराव गोराडे यांच्या लक्षात आले की, आपला प्लॉट अब्दुल सत्तार यांनी बळकवलेला आहे. त्यात त्यांनी शासन स्तरावर तक्रारी निवेदन देऊन पाठपुरावा केला, परंतु त्यांना अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे 08 फेब्रुवारी 2024 रोजी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांच्या पुढाकाराने शासनाची बरात नावाने आगळेवेगळे आंदोलन सिल्लोड शहरात करण्यात आले होते. आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजले होते, आंदोलनानंतर पोलीस ठाणे, सिल्लोड येथे तब्बल पाच तक्रारदारांनी सव्र्व्हे नंबर 92 मधील आमच्या मालमत्ता / प्लॉट बळकावल्याची लेखी तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला होता. परंतु अब्दुल सत्तार हे कॅबिनेट अल्पसंख्यांक मंत्री असल्याने पोलीस प्रशासनाने तसेच शासनाने त्याची काहीच दखल घेतली नाही.

महाराष्ट्र शासन अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करून त्यांना प्रकरणात अभय देत आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराचे तसेच गोरगरीब लोकांच्या मालमत्ता बळकवण्याचे गंभीर आरोप असताना त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. असा गंभीर आरोप गजानन गोराडे सैनिक योगेश यांचा मोठा भाऊ यानी केला आहे. देशातील सैनिकांचा प्लॉट बळकवणाऱ्या अशा व्यक्तीला महाराष्ट्र सरकार मंत्री पदावर पुन्हा बसवणार आहेत का? असा खोचक प्रश्न सुद्धा त्यांनी केला आहे.

गरज पडली तर आम्ही सहपरिवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. असे गजानन गोराडे यांनी स्पष्ट केले. भारतीय वायुसेना दलातील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्र देऊन प्रकरणात सखोल चौकशी करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार मोठ्या वादात व अडचणीत सापडले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;