Chandrapur News जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहारातून विषबाधा, 80 विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Chandrapur News जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहारातून विषबाधा, 80 विद्यार्थी रुग्णालयात दाखल

विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना सावली तालुक्यातील पारडी गावातील जिल्हा परिषद शाळेत घडली. यात 80 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व विषबाधीत विद्यार्थ्यांना सावलीचे ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले.

पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये 133 पटसंख्या असुन घटनेच्या दिवशी 126 विद्यार्थी हजर होते. शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना उखडलेला चणा, तिखट व मिठ लावून दिलेले होते. परंतु दिलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने विद्यार्थ्यांना रात्रोच्या वेळेस उलटया, हगवण व ताप येणे सुरु झाले. विद्यार्थी शाळेत आले त्यावेळेसही विद्यार्थी उलटया करीत असल्याने काही विद्यार्थ्यांना सावलीचे ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सावली येथे तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करुन विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत असले तरी या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपचार करण्यास अडचण निर्माण होत आहे.जागेअभावी 25 विद्यार्थ्यांना मुल येथील उप जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. दोन महिन्यापूर्वी पोषण आहार असल्याने विद्यार्थ्यांना उलटया, हगवण व ताप आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केल्या जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;