IND vs AUS Test – टीम इंडियाने नाणेफेक जिंकला; ‘प्लेइंग 11’मध्ये तीन बदल; रोहित मधल्या फळीत खेळणार
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर करंडकातील दुसरा सामना आजपासून अॅडलेड येथे सुरू झाला. पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेणाऱ्या हिंदुस्थानपुढे पिंक बॉल कसोटीत विजय मिळवण्याचे आव्हान आहे. चार वर्षापूर्वी याच मैदानावर झालेल्या पिंक बॉल कसोटीत हिंदुस्थानचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे यंदा रोहित शर्माने मोठा जुगार खेळला आहे. पर्थमध्ये विजयी झालेल्या हिंदुस्थानच्या संघात अॅडलेडमध्ये 3 बदल करण्यात आले, तर ऑस्ट्रेलियानेही एक बदल केला आहे.
पर्थ कसोटी खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांना अॅडलेड कसोटीतून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी आर. अश्विन, शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी कमबॅक केले आहे. तर ऑ्स्ट्रेलिने जायबंदी जोश हेझलवूड याच्या जागी स्कॉट बॉलंड याचा संघात समावेश केला आहे.
Team News
Here’s our Playing XI
Live
https://t.co/upjirQCmiV#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/RZ18jDZylv
— BCCI (@BCCI) December 6, 2024
अश्विन ठरणार ट्रम्प कार्ड
वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी आर. अश्विनला संघात स्थान मिळाले आहे. या कसोटीत तो ट्रम्प कार्ड ठरण्याची शक्यता आहे. याला कारण आहे त्याचा पिंक बॉल कसोटीमधील रेकॉर्ड. त्याने आतापर्यंत 4 डे-नाईट कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 13.83 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत. तर अॅडलेडमध्येही अश्विनचा रेकॉर्ड चांगला असून त्याने 3 कसोटीत 16 विकेट्स घेतलेल्या आहेत.
अॅडलेड कसोटीतील प्लेइंग 11
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नीतीश रेड्डी, आर अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Team News
Comment List