… अन् गुलाबी चेंडूंचा वापर सुरू झाला

… अन् गुलाबी चेंडूंचा वापर सुरू झाला

कसोटी क्रिकेटची ढासळत चाललेली लोकप्रियता आणि प्रेक्षकांमध्ये असलेली उदासिनता दूर करण्यासाठीच कसोटी क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूंचा वापर करत डे-नाईट कसोटींचा काळ सुरू झाला. कसोटी क्रिकेटला रंजक बनविण्यासाठी आणि क्रिकेट चाहत्यांची गर्दी वाढावी म्हणून अनेक संघ कसोटी सामने डे-नाईट खेळवत आहेत.

2000 सालात टी-20 क्रिकेटच्या वाढत चाललेल्या लोकप्रियतेने आयसीसीला कसोटी क्रिकेटला रंजक बनवण्यासाठी भाग पाडले. इंग्लिश क्रिकेट मंडळाने 2010 साली कसोटी क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडू आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बांगलादेशविरुद्ध डे-नाईट कसोटी सामनाही निश्चित केला होता. 2010 साली लॉर्ड्सवर तो कसोटी सामनाही खेळविला जाणार होता. पण या कसोटीपूर्वी दोन्ही देशांनी चार दिवसांत गुलाबी चेंडूची चाचणी घेण्याची मागणी केली आणि हा प्रयोग येथेच थांबला. त्याआधी महिला क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रायोगिक तत्त्वावर गुलाबी चेंडूचा सामना खेळविला गेला होता. त्यामुळे लवकरच लाल आणि पांढऱया चेंडूसह गुलाबी चेंडूही क्रिकेट जगतात येण्याची शक्यता वाढली होती.

अखेर 2015 साली न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍडलेड ओव्हलवर गुलाबी चेंडूचा वापर करत डे-नाईट सामना खेळविण्यात आला आणि कसोटी क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. त्यानंतर सातत्याने गुलाबी चेंडूत डे-नाईट कसोटी सामने खेळविले जात आहेत आणि या कसोटीला प्रेक्षकही गर्दी करत असल्याचे चित्र दिसतेय.

आतापर्यंत 22 कसोटी सामने डे-नाईट खेळविण्यात आले आहेत. दुसरा कसोटी सामना दुबई येथे पाकिस्तान आणि विंडीज यांच्यात रंगला होता. तसेच हिंदुस्थानचा संघ आपला पहिला सामना 2019 साली बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला. हा सामना हिंदुस्थानने जिंकला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;