शिवांकिता दीक्षितची ‘डिजिटल अरेस्ट’, सायबर ठगांनी व्हिडीओ कॉलवरून उकळले 99 हजार रुपये

शिवांकिता दीक्षितची ‘डिजिटल अरेस्ट’, सायबर ठगांनी व्हिडीओ कॉलवरून उकळले 99 हजार रुपये

फेमिना मिस इंडिया झालेल्या शिवांकिता दीक्षित सायबर फ्रॉडची शिकार ठरली. सायबर ठगांनी तिला सुमारे दोन तास व्हिडीओ कॉलवरून डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले आणि नंतर 99 हजार रुपये उकळले. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून या भामटय़ाने शिवांकिताला मनी लॉण्डरिंग आणि अपहरणाचे पैसे तिच्या बँक खात्यात येत असल्याचे सांगून धमकी दिली.

व्हिडीओ कॉलवरील व्यक्ती पोलिसांच्या ड्रेसमध्ये दिसल्याचे शिवांकिताने सांगितले. एकामागून एक चार अधिकाऱ्यांशी बोलणे झाले. हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढा, अन्यथा तुम्हाला अटक करून तुरुंगात जावे लागेल, असे ते म्हणाले. शिवांकिताने फसवणूक करणाऱ्याने नमूद केलेल्या खात्यावर दोन वेळा ऑनलाइन 99 हजार रुपये पाठवले. फसवणूक झाल्याचे समजताच  पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;