मुद्दा – अर्थव्यवस्थेचे नेमके ‘वास्तव’ आहे काय?

मुद्दा – अर्थव्यवस्थेचे नेमके ‘वास्तव’ आहे काय?

>> अनंत बोरसे   

केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील अर्थव्यवस्थेचे खरे ‘वास्तव’ देशासमोर आले आहे. गेल्या वर्षी  जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशाचा विकास होता 8.1 टक्के. मात्र तुलनेने या वर्षीचा विकास दर हा केवळ 5.4 टक्के इतका आहे. मात्र दावे केले जात होते 6.2 ते 6.5 टक्के इतका असण्याचे. विकास दरात झालेली घसरण ही चिंतेची बाब आहे. विकास दरात झालेल्या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत, रोजगारात, अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या उत्पादन क्षेत्राच्या दरात झालेली घसरण, जुलै-सप्टेंबर तिमाहीत हा दर केवळ 2.2 टक्के इतकाच आहे, तर गेल्या वर्षी हा तब्बल 14.3 टक्के इतका होता, तर बांधकाम क्षेत्राचा दरदेखील घसरला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत 13.6 टक्के असणारा दर हा या वर्षी 7.7 टक्के इतका राहिला आहे. सेवा क्षेत्राकडून काहीसे दिलासादायक चित्र आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत 6 टक्के असलेला दर वाढून 7.1टक्के इतका झाला आहे. त्याचबरोबर खाण उद्योग क्षेत्रातील दराने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 11 टक्के असलेला दर यावेळी उणे 0.01 टक्के इतका आहे. कृषी क्षेत्राची कामगिरी काहीशी समाधानकारक आहे. सातत्याने भारतीय रुपयाची घसरण होत आहे तर आयात-निर्यात याची तफावत वाढत आहे. या सर्वांचा सामान्य जनतेचा थेट संबंध नसला तरी अप्रत्यक्षपणे मोठा विपरीत परिणाम होत आहे. ऐकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गरीब अधिक गरीब, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे आणि देशातील 90 टक्के जनता महागाईच्या आगडोंबामध्ये होरपळत आहे. चहूबाजूंनी ‘ये डायन महंगाई खायें जा रही है.’ जनतेला जगण्यासाठी लागणाऱ्या किमान गरजादेखील महाग झाल्या आहेत. शिक्षण आवाक्याबाहेरचे झाले आहे, खाण्याच्या चीजवस्तू, डाळी, तेल, तूप, औषधे सगळे काही महागले आहे. परिणामी अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. काढ कर्ज आणि कर खर्च ही प्रवृत्ती घातक ठरत आहे, तर भविष्यातील तरतूद म्हणून केली जाणारी बचत मोठय़ा प्रमाणावर घटत आहे. आर्थिक तंगीमुळे अनेकांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो आहे. अनेक कुटुंबे सामुहिक आत्महत्या करीत आहेत. याला कारण म्हणजे वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार. अधून मधून माध्यमातून किरकोळ महागाई निर्देशांक घसरला, स्वस्ताई आली अशा बातम्या येत असतात. मात्र तो सगळा माध्यमी प्रचार ठरतो. घरे घेणे तर आजकाल कोणालाही परवडणारे राहिले नाही. घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, परवडणाऱ्या घरांची जाहिरातबाजी केवळ दिशाभूल आहे. स्टार्ट अप इंडिया, स्कील डेव्हलपमेंट प्लॅन, मेक इन इंडिया याचे झाले तरी काय? असंघटित क्षेत्राची आकडेवारीच गोळा केली जात नाही की जाहीर केली जात नाही. महागाईचा दर, विकासाचा दर, राष्ट्रीय सकल उत्पन्न, दरडोई उत्पन्न याच्या आकडेवारीत सामान्य माणसाला काडीचाही रस नाही. ही आकडेवारी पोटं भरून टीव्हीवर चर्चा करणाऱ्यांसाठीच ठीक आहे. सामान्य जनता मात्र रोजच्या जीवनात जगण्याच्या विवंचनेत त्रस्त आहे. आरबीआय असो की इतर स्वायत्त संस्था या सरकारचीच भाषा बोलतात आणि आभासी चित्र रंगवतात. अर्थव्यवस्थेचे नेमके ‘वास्तव’ आहे काय?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;