गुजरातमध्ये ईडीच्या तोतया अधिकाऱ्यांचे पथक, 12 जणांना बेड्या

गुजरातमध्ये ईडीच्या तोतया अधिकाऱ्यांचे पथक, 12 जणांना बेड्या

गुजरातच्या गांधीधाम येथे ईडीच्या 12 तोतया अधिकाऱ्यांच्या पथकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  बॉलीवूडमधील सिनेमाप्रमाणे या टोळीने एका सराफाच्या दुकानात धाड टाकून 22.25 लाख रुपयांची रोकड आणि दागिने चोरले. सराफा व्यावसायिकाने कच्छ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर विविध पथके तयार करून कारवाई करत 12 जणांना पकडले.

भारत मोरवादीया, देवायत खच्चर, अब्दुलसत्तार मंजोठी, हितेश ठक्कर, विनोद चुडासामा, इय़ुजीन डेव्हिड, आशिष मिश्रा, चंद्रराज नायर, अजय देबे, अमित मेहता आणि त्याची पत्नी निशा मेहता तसेच शैलेंद्र देसाई या बारा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारवाईत 22.27 लाख रुपयांचे सोने आणि तीन कार हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणातील आणखी एक आरोपी विपीन वर्मा याचा पोलीस शोध घेत आहेत. मोरवादीया याने राधिका ज्वेलर्सवर धाड टाकण्याचा कट रचला. याच सराफा व्यावसायिकावर सहा वर्षांपूर्वी आयकर विभागाची धाड पडली होती. या कारवाईत मोठय़ा प्रमाणावर रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले होते. राधिका ज्वेलर्सच्या मालकांकडे 100 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती मोरवादीया याने खच्चरला दिली. त्यानंतर 15 दिवसांपूर्वी एका चहाच्या टपरीवर सर्वजण भेटले आणि ज्वेलर्सवर ईडीचे अधिकारी असल्याचे सांगून धाड टाकण्याचा प्लॅन बनवल्याचे आरोपींच्या जबाबात समोर आले.

असा बनवला प्लॅन

चहाच्या दुकानावर धाडीचा प्लॅन तयार करण्यात आला. त्यानंतर नायर, अमित, निशा, विपीन शर्मा आणि अहमदाबादच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयात अनुवादक म्हणून काम करणाऱ्या शैलेंद्र देसाई यांना प्लॅनमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर अंकित तिवारी नावाने ईडी अधिकारी म्हणून बनावट ओळखपत्र तयार केले. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी सर्वजण राधिका ज्वेलर्स परिसरात पोहोचले आणि निशा मेहता हिने 23.25 लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;