जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो का नाही हे विचारण्याची शिंदेंची हिंमत नाही! – संजय राऊत

जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो का नाही हे विचारण्याची शिंदेंची हिंमत नाही! – संजय राऊत

एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावरून शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी भाजपवर शरसंधान केले आहे. संजय राऊत यांनी एक्सवर शपथविधीची एक जाहिरात पोस्ट केली आहे आणि त्यावरून शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ‘‘एकनाथ शिंदे ऊठसूट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरतात, पण या प्रमुख जाहिरातीत साहेबांचा फोटो का नाही? हे विचारण्याची हिंमत नाही,’’ असे संजय राऊत यांनी नमूद केले आहे.

नव्या सरकारच्या शपथविधी सोहळय़ाचा मोठा तामझाम भारतीय जनता पक्षाने केला होता. मोठमोठय़ा जाहिराती केल्या गेल्या होत्या. त्यावर महापुरुषांचे फोटो होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे फोटो होते, परंतु हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नव्हता. त्यावरून शिवसेनाप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;