शिवसैनिकांनो, उठा… कामाला लागा, यश आपलेच असेल! नवी मुंबईत शिवसेनेचा मेळावा दणक्यात

शिवसैनिकांनो, उठा… कामाला लागा, यश आपलेच असेल! नवी मुंबईत शिवसेनेचा मेळावा दणक्यात

विधानसभा निवडणुकीत आपल्याला कमी जागा मिळाल्या असल्या तरी खचून जाऊ नका. या निवडणुकीत ज्या शक्तीच्या विरोधात आपण मुकाबला केला ते आपले मोठे यश आहे. आपल्याकडे संघटनात्मक ताकदीचे मोठे बळ असल्याने आता लागलेले निकाल नंतर बदलणार आहेत. त्यामुळे उठा, नव्या उमेदीने कामाला लागा, यश आपल्यालाच मिळणार आहे, असा विश्वास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेळाव्यात ते बोलत होते.

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बुधवारी सायंकाळी शिवसेनेचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेना ही संघर्षातून उभी राहिली आहे. त्यामुळे यश आणि अपयशाची शिवसैनिक कधीच पर्वा करीत नाहीत. सर्व पक्षांपेक्षा आपले संघटनात्मक बळ हे मोठे आहे. याच बळाच्या जोरावर आपण यश खेचून आणणार आहोत. या निवडणुकीत आपली लढाई फक्त भाजप आणि मिंधे गटाबरोबर नव्हती तर ईव्हीएम, पेंद्राचे बाहुले म्हणून काम करणारा निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे प्रशासन यांच्या विरोधात होती. परिस्थिती प्रतिकूल असताना आपणही ताठपणे उभे राहून 15 चे 20 करून दाखवले. त्यामुळे आपण हरलो नसून जिंकलो आहोत, हे लक्षात ठेवून कामाला लागा, असे आवाहनही अंबादास दानवे यांनी या वेळी शिवसैनिकांना केले. याप्रसंगी शिवसेना नेते राजन विचारे, अर्थतज्ञ विश्वास उटगी, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, प्रवक्ते अनिश गाढवे, एम.के. मढवी, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, संतोष घोसाळकर, मनोज इसवे, संदीप पाटील, सूर्यकांत मढवी, शहरप्रमुख काशिनाथ पवार, प्रवीण म्हात्रे, महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर, उपजिल्हा संघटक विनया मढवी, वैशाली घोरपडे, शहर संघटक कोमल वास्कर, सुनीता मांडवे, शशिकला पराजुली, उषा रेणके, सतीश रामाणे, रंगनाथ औटी, स्मिता धमामे, अजय पवार आदी उपस्थित होते.

आक्षेप घेतले, पण कारवाई झाली नाही

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये 1 लाख 66 हजार दुबार मतदार आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात 39 हजार नावे दुबार आहेत. या दुबार मतदारांना यादीतून वगळण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वेळा आक्षेप घेण्यात आला. मात्र सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यानुसार काम करणाऱ्या निवडणूक आयोगाने या दुबार नावांवर कोणतीही कारवाई केली नाही, असे या वेळी शिवसेना नेते राजन विचारे यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;