आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस; नागार्जुन यांची सून शोभितासाठी भावनिक पोस्ट

आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस; नागार्जुन यांची सून शोभितासाठी भावनिक पोस्ट

साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलीपालासोबत त्याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. काल म्हणजे 4 डिसेंबर 2024 रोजी नागा आणि शोभिता लग्नबंधनात अडकले. त्यांचे लग्न ठरल्यापासूनचे प्रत्येक विधी हे एखाद्या सणाप्रमाणे पार पडलेले पाहायला मिळाले. शोभिताचे नागा कुटुंबात मोठ्या थाटामाटात आणि प्रेमात स्वागत झालं.

नागा कुटुंबात सून शोभिताचे थाटात स्वागत

लग्न पार पडल्यानंतर शोभिताचे सासरे आणि अभिनेते नागार्जुन यांनी त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. एवढच नाही तर त्यांनी आपल्या सुनेसाठी एक भावनिक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. नागार्जुन यांच्या या पोस्टवरून एक वडिल म्हणून आपल्या मुलाचे घर पुन्हा एकदा उभारताना पाहून त्यांना आनंद झाल्याचे दिसून येते.

“आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस…”

नागार्जुन यांनी नागचैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “शोभिता आणि माझा मुलगा नागा चैतन्य यांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. त्यांचा हा नवीन प्रवास सुरू होताना पाहणं हा क्षण माझ्यासाठी भावनिक होता. चैतन्य तुझं खूप खूप अभिनंदन! प्रिय शोभिता तुझं कुटुंबात मनापासून स्वागत… तू आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस.” असं म्हणत त्यांनी आपल्या सुनेचं गोड कौतुक करत त्यांच्या भावना व्यक्त करू.
दरम्यान नागार्जुन यांची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होतेय.

त्यांनी पुढे एएनआर गुरूंची उल्लेख करत लिहिले की, “हे लग्न आणखी खास बनले आहे कारण त्यांनी त्यांना आशीर्वादही दिला आहे, या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे प्रेम आणि मार्गदर्शन आमच्यासोबत आहे असे वाटते. आज आपल्यावर झालेल्या असंख्य आशीर्वादांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.’ असं म्हणत नागार्जुन यांनी आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत.

नागचैतन्य आणि शोभिता यांचा लग्नातील लूकही बराच व्हायरल होतोय. त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीचा पेहेराव केला आहे. तसेच काही खास मित्रमंडळी आणि घरच्या मंडळीमध्येच यांचा विवाह संपन्न झाला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;