मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ; अखेरच्या मिनिटांपर्यंत रंगले मिंधेंचे नाराजी नाट्य!

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ; अखेरच्या मिनिटांपर्यंत रंगले मिंधेंचे नाराजी नाट्य!

महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज पद व गोपनियतेची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मुंबईत आझाद मैदान येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्याच्या अखेरच्या मिनिटांपर्यंत एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही? यावरून मोठे नाराजी नाट्य रंगले. मुख्यंमत्रीपदाचा शपथविधी सोहळा काही मिनिटांवर आला असताना अखेर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जाहीर करण्यात आले. त्यामुळे महायुतीमधील धुसफूस कायम असून ती पुन्हा चव्हाट्यावर आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;